close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ट्विंकल खन्नाविरोधात फसवणूकीचा आरोप, नोटीस जारी

यासंदर्भात कायदेशीर तक्रार झाली असून तिला नोटीसही पाठविण्यात आली आहे.

Updated: Jan 6, 2018, 11:29 AM IST
ट्विंकल खन्नाविरोधात फसवणूकीचा आरोप, नोटीस जारी

मुंबई : बॉलीवूड सेलिब्रेटी ट्विंकल खन्नावर फसवणूकीचा आरोप ठेवण्यात आा आहे.. यासंदर्भात कायदेशीर तक्रार झाली असून तिला नोटीसही पाठविण्यात आली आहे.

प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करुन फसवल्याचा तिच्यावर आरोप आहे. 

लोकांची दिशाभूल 

डेक्कन क्रॉनिकलने दिलेल्या वृत्तानुसार,सात फ्लॅट मालकांना वेळेवर प्रॉपर्टी पजेशन मिळाले नसल्याने त्यांनी कायद्याची मदत घेतली.

ट्विंकल केवळ प्रॉपर्टीच्या जाहिरातीतच दिसली नाही, तर तिने फ्लॅट्स घेण्यासाठी लोकांची दिशाभूल केली. 

उत्तरदायी 

ती या प्रोजेक्टची आर्किटेक्चरदेखील आहे. तिने हे फ्लॅट्स विकण्याची जबाबदारीही घेतल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. त्यामूळे घडलेल्या प्रकाराला ती उत्तरदायी असल्याचेही तक्रारदारांनी सांगितले. 

ट्विंकलचा 'पॅडमॅन'

इंटेरिअर डिझायनर असलेली ट्विंकल खन्न लेखक आमि प्रोड्यूसरही आहे. २५ जानेवारीला येणारा अक्षय कुमारचा आगामी सिनेमा पॅडमॅन ट्विंकलनेच प्रोड्यूस केला आहे.