...पण लॉकडाऊन उत्तर नाही - महेश कोठारे

राज्यात  कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे राज्य लॉकडाऊनच्या दिशेने पाऊल टाकत आहे.

Updated: Apr 13, 2021, 03:14 PM IST
...पण लॉकडाऊन उत्तर नाही - महेश कोठारे

मुंबई : राज्यात  कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे राज्य लॉकडाऊनच्या दिशेने पाऊल टाकत आहे. पण यंदाच्या लॉकडाऊनला  अनेकांनी विरोध दर्शवाला आहे. लॉकडाऊनला विरोध असलेल्यांच्या यादीत आता प्रसिद्ध निर्माते आणि अभिनेत महेश कोठारे देखील सामील झाले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी विरोध दर्शवला आहे. महेश कोठारे यांचं ट्विट सध्या तुफान  व्हायरल होत  आहे. 

'लॉकडाऊन हे उत्तर नाही' असं ट्विट कोठारे यांनी केलं. त्यांच्या या ट्विटमुळे नेटकऱ्यांनी कोठारेंना ट्रोल केलं आहे. काही युजर्सनी महेश कोठारे यांचा गेल्या वर्षीचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये महेश कोठारे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब थाळ्या वाजवत करोना योद्धांचा सन्मान करताना दिसतं आहेत.

'यांना कोरोना झाला तर सर्व सोयी सुविधा मिळणार म्हणून बोलायला सूचतयं. थाळी वाजवा तेवढचं जमणार तुम्हाला.' असं म्हणतं अनेकजण कोठारे कुटुंबाला ट्रोल करत आहेत. दरम्यान राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू शकतो अशी दाट शक्यता आहे.