Salman Khan's Tiger 3 : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा 'टायगर 3' हा चित्रपट प्रेक्षकांच्या दिवाळीच्या निमित्तानं प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील पाचवा चित्रपट आहे. दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित झाला त्यावेळी पहिल्याच दिवशी 44.5 कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 59.25 कोटी कमाई केली. त्यानंतर ही कमाई हळू-हळू कमी झाली. तर पाचव्या दिवशी या चित्रपटानं 18 कोटी कमाई केली. 'टायगर 3' नं इतकी कमी कमाई केल्यानं सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. मुंबईच्या थिएटचे मालक मनोज देसाई देखील चित्रपटाच्या कलेक्शननं दु:खी आहेत. त्याचा हा व्हिडीओ केआरकेनं शेअर केला आहे.
केआरकेनं मनोज देसाई थिएटरमध्ये सध्या दाखवण्यात येणाऱ्या 'टायगर 3' चित्रपटाची दिवसेंदिवस कमी होत असलेल्या कमाईविषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत. G7 multiplex आणि मराठा मंदिर चित्रपटाचे एग्जिक्यूटिव डायरेक्टर मनोज देसाई यांनी 'टायगर 3' या चित्रपटाची कमी होत असलेल्या कमाईवरून निराशा व्यक्त केली आहे.
Everyone aware of this. #YRF giving fake box office numbers #Tiger3BoxOfficeScam pic.twitter.com/9XBT3OzDkt
— (@IamEshwaaR) November 16, 2023
मनोज यांचा हा व्हिडीओ केआरकेनं शेअर केला आहे. या व्हिडीओत मनोज बोलताना दिसत आहेत की 'खूप आशा केली होती पण जेव्हा चित्रपट हाऊसफूल नाही गेला तर निराशा झाली आहे. सुपर डूपर हिटची गोष्टच राहिली नाही.'
इतकंच नाही तर पुढे देसाई यांनी चित्रपटाच्या स्टोरीवर देखील कमेंट केली. त्यांनी म्हटलं की चित्रपटात एक रॉ एजेंट पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे रक्षण करतो, तर हे भारताच्या प्रेक्षकांना कधीच आवडणार नाही. त्यांच मत मांडताना त्यांनी म्हटलं की जेव्हा वर्ल्ड कपमधून पाकिस्तानची टीम बाहेर आली तेव्हा लोक सकाळी चार वाजेपर्यंत रस्त्यावर डान्स करत होते. त्यांनी हे देखील म्हटलं की सलमान आणि कतरिनाची जोडी स्क्रिनवर खूप चांगली दिसत आहे. तर जेव्हा पठाण म्हणजेच शाहरुख खानची एन्ट्री होते तेव्हा सगळे टाळ्या वाजवताना दिसतात. प्रेक्षकांना सलमान आणि शाहरुखचे सीन प्रचंड आवडले आहेत. त्यामुळे त्यांना देखील कळत नाही आहे की नक्की कुठे काय गंडलं आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी हा खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे.