close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'मेड इन चायना' चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

'मेड इन चायना' चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Updated: Sep 18, 2019, 06:24 PM IST
'मेड इन चायना' चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : 'ड्रीम गर्ल' चित्रपटानंतर पोट धरून हसण्यास भाग पाडणारा 'मेड इन चायना' चित्रपट चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला. आज चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. 'कस्टमर की नीड ताला हैं. जिस दिन टाले की चाबी मिल गई, फिर तूम बन गये एंटरप्रन्योर...' मोठा उद्योगपती बनण्याचे स्वप्न उरी बाळगलेल्या अभिनेता राजकुमार रावचा प्रवास चित्रपटात चाहत्यांना अनुभवता येणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तो 'रघू' ही भूमिका साकारताना दिसत आहे. 

अत्यंत विनोदी असणाऱ्या 'मेड इन चायना' चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. व्यवसायासाठी चीन राजकुमार चीनला जातो. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात मोठे बदल होतात. चीनमध्ये गेल्यानंतर त्याला गुप्तरोगांवर उपचार करण्यासाठी एक प्रोडक्ट मिळतं. त्यानंतर भारत देशात येवून तो त्या प्रोडक्टची विक्री करतो. हा चित्रपट २५ ऑक्टोबर रोजी रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. 

अभिनेत्री मौनी रॉय चित्रपटात राजकुमारच्या पत्नीची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. त्याचप्रमाणे बोमण इराणी सेक्सोलॉजिस्टची व्यक्तीरेखा वठविली आहे. त्यांच्याव्यतिरिक्त चित्रपटात परेश रावल, अमायरा दस्तूर, गजराज राव आणि सुमित व्यास देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.