मुंबई : लग्न हा कोणत्याही मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. या खास आनंदी क्षणांची प्रत्येक मुलगी आतुरतेने वाट पाहत असते. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राच्या आयुष्यात या सुखद क्षणांचे आगमन झाले आहे. लवकर प्रियंका बॉयफ्रेंड निक जोनससोबत विवाहबद्ध होईल. पण ११ वर्ष लहान निक जोनससोबत विवाहबंधनात अडकण्यापूर्वी प्रियंकाची आई मधु चोप्रा यांनी तिला खास सल्ला दिला आहे.
प्रियंका आणि निक यांनी अनेक दिवसांपासून एकत्र स्पॉट करण्यात येत होते. इतकंच नाही तर प्रियंकाच्या वाढदिवसादिवशीच त्यांचा साखरपुडा झाल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. पण १८ ऑगस्ट म्हणजेच आज निक-प्रियंका साखरपुडा करत असल्याची खबर समोर आली आहे. यानंतरच कदाचित दोघेही आपल्या नात्याची अधिकृतपणे कबुली देतील.
याचदरम्यान मधु चोप्रा यांच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात त्या म्हणतात की, आपल्या पत्नीच्या आरोग्याची आणि आनंदाची काळजी घेऊ शकेल, इतके पतीला काबील व्हायला हवे. दोघांमध्ये प्रेम इतके असावे की, प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन डे सारखा वाटावा. यात त्यात आपल्या वैवाहिक आयुष्याचाही दाखला देतात.
पुढे त्या म्हणाल्या की, एकमेकांशी भांडणापेक्षा एकमेकांशी बसून एकमेकांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आईचा हा सल्ला प्रियंकाला नक्कीच उपयोगी पडेल. दीर्घ काळापासून डेट करत असलेले प्रियंका-निकचे नाते आता विवाहपर्यंत येऊन ठेपले आहे.
प्रियंका चोप्राने अलिकडेच शोनाली बोसच्या 'द स्काई इज पिंक' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली. या सिनेमात प्रियंकासोबत फरहान अख्तर मुख्य भूमिकेत आहे. नुकताच निक आणि प्रियंका साखरपुडा संपन्न झाला.
Priyanka Chopra and Nick Jonas at their 'roka' ceremony in Mumbai. #PriyankaNickEngagement pic.twitter.com/IShuMYuegd
— ANI (@ANI) August 18, 2018