बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा मधुबाला यांच्या चित्रपटाचं शुटिंग पाहिलं तेव्हा म्हणाले....

बॉलिवूडमध्ये जेव्हा-जेव्हा सर्वात सुंदर अभिनेत्रींचा उल्लेख केला जातो, तेव्हा पहिलं नाव समोर येतं ते म्हणजे अभिनेत्री मधुबाला यांचं. 

Updated: May 13, 2021, 05:11 PM IST
बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा मधुबाला यांच्या चित्रपटाचं शुटिंग पाहिलं तेव्हा म्हणाले.... title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये जेव्हा जेव्हा सर्वात सुंदर अभिनेत्रींचा उल्लेख केला जातो, तेव्हा पहिलं नाव समोर येतं ते म्हणजे अभिनेत्री मधुबाला यांचं. 'व्हॅलेंटाईन डे'ला जन्मलेल्या मधुबाला यांनी अगदी लहान वयातच जगाचा निरोप घेतला. मधुबाला यांच्या प्रेमात अनेक कलाकार होते. यांत शम्मी कपूर, दिलीप कुमार यांचा समावेश होता. बाळासाहेब ठाकरे यांची दिलीप कुमार यांच्याशी मैत्री होती, तेव्हा बाळासाहेब यांची देखील मधुबाला आवडती अभिनेत्री होती.

पेंग्विन इंडियाद्वारे प्रकाशित करण्यात आलेलं पुस्तक 'बॉलीवूड टॉप 20- सुपरस्टार्स ऑफ इंडिया'मध्ये बाळसाहेब ठाकरे यांनी चित्रपट जगतातील काम करणाऱ्या त्यांच्या दिवसांतील काही आठवणी शेअर केल्या आहेत.

मधुबाला यांचा किस्सा सांगताना बाळासाहेब ठाकरे यांनी पुस्तकात लिहिलं की, 'जेव्हा मी मधुबाला यांना एक दिवस शूटिंग करताना पाहिलं तेव्हा मला वाटले की, 'मेरा दिन बन गया'

वेड्यासारखं प्रेम करायचे शम्मी कपूर मधुबाला यांच्यावर
शम्मी कपूर यांनी 'शम्मी कपूर द गेम चेंजर' या आत्मचरित्रात मधुबाला यांना एक चॅप्टर डेडिकेट केला होता. मधुबाला यांच्या प्रेमात अयशस्वी झालेल्या शम्मी कपूर यांनी लिहिलं की, 'मला माहित होतं की, मधु दुसर्‍याच्या प्रेमात आहे.'

शम्मी कपूर म्हणाले, 'मला हे कबूल करायचं आहे की, मी वेड्यासारखं त्यांच्यावर प्रेम केलं. यासाठी कोणालाही दोषी ठरवलं जाऊ शकत नाही, कारण मी त्यांच्यासारखी सुंदर स्त्री कधीही पाहिली नाही. ' 'रेल का डिब्बा' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मधुबाला यांना पाहिल्यावर ते आपला डायलॉग विसरले होते.

अशी झाली दिलीपकुमार यांच्यासोबत भेट
मधुबाला आणि दिलीप कुमार कदाचित कधीच एकमेकांचे होवू शकले नाही, पण या दोघांच्या लव्हस्टोरीचे किस्से आजही चाहत्यांच्या आठवणीत आहेत. 1955 साली 'इंसानियत' चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये दोघे एकत्र दिसले होते.

दिलीप कुमार यांनी त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये सांगितलं की, मधुबाला यांची प्रॉडक्शन कंपनी त्यांच्या लग्नाच्या विरोधात होती. दिलीपकुमार यांच्या म्हणण्यानुसार, 'मी स्वतःहून माझे प्रोजेक्ट निवडतो आणि त्यात माझं स्वत: चं प्रॉडक्शन हाऊस असलं तरीही मी ते सोडून देवू शकत नाही'