Madhuri Dixit Nene: बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजेच माधुरी दीक्षित (madhuri dixit) वयाच्या पन्नाशीतही चाहत्यांना भूरळ पडेल अश्या स्वप्नाळू सौंदर्याची महाराणी आहे. माधुरी दीक्षितने पती (madhuri dixit husband) श्रीराम नेने (Sriram Nene) यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. डॉक्टरची पत्नी असल्यामुळे तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. त्यावर तिने भाष्य केलं आहे. (Madhuri Dixit talks about tough time after marriage with Sriram Nene)
माधुरी दीक्षितच्या सौंदर्यापुढे आजही नवोदित अभिनेत्री फिक्या पडतील. माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आजही तिच्या सौंदर्याने लाखो हृदयांवर राज्य करते. हीच अनेक ह्रदय तोडून माधुरीने डॉक्टर नेने (Dr. Sriram Nene) यांच्यासह लग्नगाठ बांधली. त्याची व्यथा माधुरीने बोलताना मांडली आहे.
माझ्या नवऱ्याला वेळ मिळत नसल्यामुळं खूप अवघड होतं, कधी मॉर्निंग शेड्यूल, कधी नाईट शेड्यूल असायची. तर कधी त्याचा फोनवर व्यस्त असायचा. त्यामुळे आम्हाला वेळ मिळत नव्हता. ती खूप अवघड वेळ होती. तू तिथे नव्हतास आणि मी नेहमी मुलांसोबत असायचे. कोणत्याही कार्यक्रमाला तू नसायचा. एवढंच काय तर तू मी आजारी असताना देखील इतर लोकांची काळजी घेत होतास, असं माधुरी श्रीराम नेने यांना म्हणताना दिसत आहे.
मला तुझा नेहमी अभिमान वाटतो, जसं तू नेहमीच रूग्णांसाठी उभा राहायचा, त्यामुळे बाकीच्या गोष्टींचं दु:ख नाही. रूग्णांसाठी उभा रहायचं आणि त्यांच्या आयुष्यासाठी लढायचं, या गोष्टीमुळे तुम्ही माझं मन जिंकलं, असंही माधुरी म्हणते. लग्नात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही समोरच्या व्यक्तीला समजून घेणं. आम्ही दोघांनीही वैवाहिक जीवनात एकमेकांना साथ दिली. त्याचबरोबर मुलांसाठी आम्ही खंबीरपणे उभं राहिलोय, असं म्हणत माधुरीने आठवणींना उजाळा (Madhuri Dixit talks about tough time) दिला आहे.
दरम्यान, माधुरी आणि श्रीराम यांची (Madhuri Dixit Son) अरीन आणि रयान ही दोन्ही मुले देखील आपल्या आईवडिलांप्रमाणेच शांत स्वभावाची आहेत. माधुरी आणि श्रीराम यांनी 17 ऑक्टोबर 1999 साली लग्न केलं. त्यावेळी श्रीराम लॉस एंजलिस येथे सर्जन होते. 18 ऑक्टोबरच्या पहाटे अचानक ही बातमी आली अन् अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. प्रेक्षक आणि चाहते सोडा... बॉलिवूड कलाकारांना देखील याची माहिती नव्हती.