वयाच्या 15 व्या वर्षी वयस्कर व्यक्तीनं केलं शारिरीक शोषण अन्..., लोकप्रिय Actress चा धक्कादायक खुलासा

Actress नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. यावेळी तिनं तिच्यासोबत झालेल्या शारिरीक शोषण पासून लैंगिक संबंधांविषयी सांगितले आहे. याव्यतिरिक्त ही अभिनेत्री तिच्या गर्भपाता विषयी मोकळेपणानं बोलली आहे. 

Updated: Feb 26, 2023, 04:58 PM IST
वयाच्या 15 व्या वर्षी वयस्कर व्यक्तीनं केलं शारिरीक शोषण अन्..., लोकप्रिय Actress चा धक्कादायक खुलासा title=

Paris Hilton On Her Physical Abuse and Abortion : प्रसिद्ध अमेरिकन मॉडेल, रिअॅलिटी टीव्ही स्टार आणि  बिझनेसवुमन पॅरिस हिल्टनच्या (Paris Hilton) एका वक्तव्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. पॅरिसनं वयाच्या 15 व्या वर्षी आलेल्या तिच्या एका भयानक अनुभवाविषयी खुलासा केला आहे. एक वृद्ध व्यक्तीनं वयाच्या 15 व्या वर्षी पॅरीसचा शारीरिक अत्याचार केला होता. त्यानंतर पॅरिस चर्चेत आली आहे. पॅरिस सध्या तिचं आत्मचरित्र  'पॅरिस: द मेमॉयर' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तिच्या या नव्या पुस्तकात तिने तिच्या आयुष्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. पॅरिसचे हे आत्मचरित्र 14 मार्च रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यानिमित्तानं पॅरिसनं ही मुलाखत दिली होती. यावेळी लहान असताना कशा प्रकारे तिचे शारिरीक शोषण झाले. याशिवाय तिच्या पहिल्या लैंगिक संबंधांचा अनुभव शेअर केला. 

पॅरिस या सगळ्या गोष्टींचा खुलासा करत म्हणाली की जेव्हा ती 15 वर्षांची होती, तेव्हा ती एका मैत्रिणीसोबत मॉलमध्ये फिरायला गेली होती, जिथे तिची भेट वयानं मोठ्या असलेल्या एका व्यक्तीशी झाली. हे लोक नेहमी दुकानांच्या अवतीभोवती फिरत असत आणि आम्ही त्यांच्याशी बोलायचो. त्यांनी त्यांचं पेजर नंबर दिल होतं. एक दिवस  त्या वृद्ध व्यक्तीनं आम्हाला त्याच्या घरी बोलावले आणि आम्ही वाइन पीत होतो. त्यावेळी ती ड्रिंक करत नसल्याचे तिनं सांगित, पुढे म्हणाली त्या व्यक्तीनं जबरदस्तीनं त्यानं बनवलेली ड्रिंक तिला प्यायला दिली. त्यानंतर तिला कळलं की तिला त्या व्यक्तीनं अंमली पदार्थ दिले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पॅरिस म्हणते, 'फक्त एक-दोन सीप पिल्यानंतर मला चक्कर येऊ लागली आणि मला अस्वस्थ वाटू लागले. त्या ड्रिंकमध्ये त्यानं काय मिक्स केले होते हे मला माहित नाही. त्यानंतर ती बेशुद्ध झाली आणि काही तासांनंतर तिला जाग आली तेव्हा तिला कळंल की तिच्यावर शारिरीक अत्याचार झाला आहे. त्यानंतर त्यावेळी काय काय झालं याची आठवण आली ते सांगत पॅरिस म्हणाली, मला सगळं आठवलं. मला आठवलं की तो माझ्या अंगावर होता आणि माझ्या कानात कुजबूजला की तू हे स्वप्न पाहत आहेस. 

हेही वाचा : Hera Pheri 3 चित्रपटात आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री?

या धक्कादायक प्रसंगानंतर देखील पॅरिस या अनुभवातून कशी बशी बाहेर पडली. पॅरिसचा म्हणण्यानुसार पुढे शाळेत असताना तिथे देखील तिच्या शिक्षकानं तिची फसवणूक करत शारिरीक शोषण करण्याचा प्रयत्न केला होता. याविषयी सांगत पॅरिस म्हणाली की एकदा या शिक्षकानं तिला कारमध्ये बोलवून तिला जबरदस्ती किस करण्यास सुरुवात केलं. त्यावेळी तिचे आई-वडील तेथे होते आणि त्यांना पाहताच माझ्या शिक्षकानं 100 च्या स्पीडवर गाडी पळवली आणि नंतर तिला घरी सोडले. त्यानंतर पॅरिसला स्वत: चीच लाज वाटू लागली होती. त्यानंतर जेव्हा ती 20 वर्षांची झाली तेव्हा ती प्रेग्नंट होती. हे कळताच तिनं गर्भपात केला. ती लहान होती आणि अशा परिस्थितीत तिचा गर्भपात झाला त्यामुळे तिला हे कोणाला सांगायचं नव्हतं.