बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या मुलाने महाराजा वेबसिरीजमधून अभिनयाला सुरुवात केली आहे. 14 जून रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या 'महाराजा' सिरीजमध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली आहे. काही दिवसांपूर्वीच सिरीजचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. या पोस्टरमधील आमिरचा मुलगा जुनैद आणि जयदीप अहलावत यांच्या लूकने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं. रिलीजला काही दिवस बाकी असताना आता ही सिरीज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
महाराजा सिरीजमध्ये दाखवण्यात आलेल्या साधूंच्या भूमिका आक्षेपार्ह असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भारतीय संस्कृतीत साधूंना मानाचं स्थान दिलं जातं. या सिरीजमध्ये दाखवण्यात आलेल्या साधूंच्या भूमिकेमुळे समाजात गैरसमज आणि द्वेष पसरला जाऊ शकतो त्यामुळे ही वेबसिरीज रिलीज होऊ देणार नाही, अशी धमकी बजरंग दलाने दिली.त्यामुळे फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून #boycuttmaharaja आणि #BoycottNetflix असा ट्रेंड सुरु करण्यात आला आहे.
The poster for Maharaj shows a tilak-sporting, tuft-bearing man on one side, while there is a sharply dressed young man (Amir Khan’s son Junaid
Anti-Hindu web-series and movies have been shown on Netflix in the past as well.#BoycottNetflix
Ban Maharaj Film pic.twitter.com/CHC5QwtSld— vinayak tambade (@VinayakTambade) June 13, 2024
या विषयी निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही. सिनेमा, वेबसिरीज हे घडणाऱ्या घटनांचा आरसा असतो, त्यामुळे या सिरीजमधून हिंदू धर्माविषयी समाजात चुकीचा समज पसरला जाऊ शकतो. म्हणूनच सनातन संस्थांकडून या सिरीजला कडाडून विरोध केला जात आहे. महाराजामधून हिंदू साधूंचा अपमान केला जात असल्याच्या टीकेची लाट समाजात निर्माण झाली.देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून 'महाराजा' विरोधात आंदोलन होत असल्याच सोशलमीडियावर पाहण्यात येत आहे.
सनातन धर्म का अपमान नही सहेगा अब हिंदुस्तान।#BoycottNetflix pic.twitter.com/WZnJPtlOSo
— सुनील रामावत ( हिंदू ) (@SUNILRA40333241) June 13, 2024
सत्य घटनेवर आधारित कथा
1862 मध्ये धर्मगुरू जदुनाथजी महाराज आणि पत्रकार रसनदास मुळजी यांच्यात झालेल्या खटल्यांवर ही सिरीज आहे. धर्मगुरू जदुनाथजी महाराज यांनी स्त्रियांना अनैतिक शारीरिक संबंध ठेवण्यात भरीस पाडल्याचा आरोप पत्रकार रसनदास मुळजी यांनी केला होता. याच संवेदनशील घटनेवर आधारीत सिरीजमध्ये रसनदास मुळजी यांच्या भूमिकेत आमिर खानचा मुलगा जुनैद खान आहे तर जयदीप अहलावत धार्मिक नेत्याची भूमिका साकारत आहे. 'हिचकी' आणि 'कल हो ना हो या' गाजलेल्या सिनेमांचा लेखक-दिगदर्शक सिद्धार्थ पी मल्होत्राने या सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. यशराज फिल्मची निर्मिती असलेली ही सिरीज 14 जूनला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.