Vanita Kharat husband does this work : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो आहे. या शोमधील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. दरम्यान, या शोमधील अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) तर सगळ्यांना माहितच आहे. वनिता यंदाच्या वर्षीच लग्नबंधनात अडकली आहे. वनितानं 2 फेब्रुवारी 2023 रोजी बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत सप्तपदी घेतल्या. वनिताच्या लग्नाच्या बातमीनं सगळ्यांना आनंद झाला होता. वनिताच्या लग्नात हास्यजत्रा कार्यक्रमातील कलाकारांनी हजेरी लावली होती. वनिताच्या लग्नानंतर तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला होता की तिचा नवरा काय काम करतो? दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वनितानं तिचा नवरा काय काम करतो ते सांगितलं आहे.
वनितानं एका पॉडकास्ट मुलाखतीत तिचा नवरा काय काम करतो याविषयी सांगितले आहे. वनिता यावेळी तिच्या नवऱ्याला तिच्यासोबत चाहते फोटो काढायला येतात तेव्हा कसे वाटते हे सांगत ती म्हणाली, 'जेव्हा चाहते फोटो काढण्यासाठी गर्दी करतात तेव्हा सुमितला फार आनंद आणि अभिमान वाटतो.' तर पुढे तिला सुमित कोणत्या क्षेत्रात काम करतो याविषयी विचारले असता वनिता म्हणाली, 'सुमित अकाऊंटट आहे. डिमार्टच्या हेट ऑफिसमध्ये तो अकाऊंटंट म्हणून काम पाहतो.' वनिता ही सुमितसोबत सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
वनिता या मुलाखतीत पुढे सांगितलं की, 'लग्नाआधी रिलेशनशिपमध्ये होते. त्यामुळे आता पुढे अफेअर करायचं नाही तर थेट लग्न करायचं असं तिचं मत नव्हतं. पण लग्न तर करायचं होतं. याआधी मी रिलेशनशिप्सचा खूप अनुभव घेतला होता. त्यानंतर एकदिवस सुमित आणि मी लग्न करण्याचा निर्णय घेतला.'
हेही वाचा : Aamir Khan ला घाबरून लंडनला पळून गेला होता करण जोहर, नेमकं काय झालं होतं?
सुमित एक अप्रतिम फोटोग्राफर आहे. सुमित त्यासोबत एक व्हिडिओ क्रिएटरदेखील आहे. याशिवाय तो एक ब्लॉगरदेखील आहे. त्याला फिरण्याची आवड असून त्यावर तो ब्लॉगही बनवत असतो. दरम्यान, बरीच वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर सुमित आणि वनितानं लग्न करण्याचा निर्णय घेतला. ते दोघे एकमेकांना उत्तम पद्धतीनं समजूनही घेतात. तर सुमितसोबत लग्न झाल्यानंतर तिचं वैवाहिक आयुष्य खूप सुंदर सुरु असल्याचं वनितानं म्हटलं आहे. खरं सांगायचं झालं तर असा कोणताही बदल जाणवत नाही. अचानक काही वेगळं झालं असं काही नाही. आमचं लव्ह मॅरेज आहे, म्हणून काही वेगळं असं वाटलं नाही. लग्न झाल्यानंतर खूप छान वाटतंय.