कॉमेडी क्वीन विशाखाला राज्यपालांच्या हस्ते 'स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमातून अभिनेत्री विशाखा सुभेदार प्रेक्षकांना खळखळून हसवते. आपल्या दमदार  कॉमेडी अंदाजाच्या जोरावर विशाखा अनेकांचे टेन्शन गायब करुन टाकते. याआधीही अनेक विनोदी कार्यक्रमांमधून विशाखाने विनोदी कलाकार म्हणून आपलं अभिनयकौशल्य दाखवलं आहे. त्यात आता विशाखा सुभेदारचा आनंद गगनात मावेनासा झालाये.

Updated: Jun 28, 2021, 01:46 PM IST
 कॉमेडी क्वीन विशाखाला राज्यपालांच्या हस्ते 'स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान title=

मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमातून अभिनेत्री विशाखा सुभेदार प्रेक्षकांना खळखळून हसवते. आपल्या दमदार  कॉमेडी अंदाजाच्या जोरावर विशाखा अनेकांचे टेन्शन गायब करुन टाकते. याआधीही अनेक विनोदी कार्यक्रमांमधून विशाखाने विनोदी कलाकार म्हणून आपलं अभिनयकौशल्य दाखवलं आहे. त्यात आता विशाखा सुभेदारचा आनंद गगनात मावेनासा झालाये.

नुकतीच विशाखाने एक गोड खास बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. विशाखा सुभेदारला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे 'स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान करण्यात आलाये. यावेळी 11 गुणवंत महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात विशाखा सह बॉलिवुड अभिनेत्री उर्वशी रौतेला, निशिगंधा वाड, कविता राऊत, गायिका पलक मुच्छल यांचा ही समावेश आहे.

या पुरस्काराचा स्वप्नवत अनुभव सांगत विशाखाने पोस्टमध्ये म्हणते, "प्रचंड आनंद .. आधी विश्वास बसत नव्हता, पण जेव्हा निमंत्रण पत्रिका हातात आली, तेव्हा खरं वाटलं. मलबार हिल ' राजभवन'ला जाण्याचा योग आला  लेकाला बरोबर घेऊन गेले होते,नेमकं महेशला काम होतं अन्यथा तो हि असता..! "

पुढे विशाखा लिहीते, "तुझी आठवण आली महेश सुभेदार. आईच्या डोळ्यातला आनंद, दादा वाहिनीच्या डोळ्यामधलं प्रेम, आणि पोराने म्हटलेलं एक वाक्य.. " आई एकदम तुला राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार घेताना पहिल आणि भरून आलं..नवरा फोनवरून सतत संपर्कात तो हि जाम खुश, सासूबाई,जाऊबाई, आत्याबाई, नणंद बाई, भावंड,सगळ्यांसगळ्यांचे कौतुकाचे फोन, मेसेज, मित्र मैत्रिणीचे फोन..शुभेच्छा वर्षाव.. खूप खूप शब्दात न सांगता येणारा न मावणारा आनंद झालाय.. मंडळी हे प्रेम आहे तुम्हा सर्वांच, ज्यामुळे मी माझं काम जबाबदारीने पार पाडण्याचा कायम प्रयत्न करत असते. असंच प्रेम कलाकारावर राहू द्या आणि सूर्यदत्त चे संस्थापक ह्यांचे देखील आभार आणि सगळ्यात महत्वाचे माझ्या देवाचे आभार...! 

हा पुरस्कार मला माझ्या कामासाठी मिळालाय आणि त्याकरिता काही मंडळी अतिशय महत्वाची आहेत ज्यांच्याशिवाय माझं काम अधुरं राहील असतं. आमची टीम "हास्यजत्रा " सचीन गोस्वामी आणि सचीन मोटे आणि माझा पार्टनर,मित्र, समीर चौगुले आणि प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव आणि पॅडी कांबळे आणि सोनी मराठी चे मनापासून आभार."