Samir Choughule ने शेअर केला 25 वर्षं जुना फोटो, म्हणाला...

Maharashtrachi Hasyajatra Samir Choughule : समीर चौघुलेनं शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. समीर सध्या ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ या मालिकेत दिसत आहे. मात्र, लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Updated: Apr 1, 2023, 03:21 PM IST
Samir Choughule ने शेअर केला 25 वर्षं जुना फोटो, म्हणाला... title=

Maharashtrachi Hasyajatra Samir Choughule : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो पैकी एक आहे. महाराष्ट्रत हा कार्यक्रम खूप लोकप्रिय आहे. प्रेक्षक आवडीनं हा कार्यक्रम पाहतात. बऱ्याच वेळा काही प्रेक्षक तर पुन्हा पुन्हा हा कार्यक्रम पाहतात. या कार्यक्रमातील सगळेच कलाकार हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. मात्र, सगळ्यात जास्त पसंतीस उतरलेला अभिनेता म्हणजे समीर चौघुले. समीर चौघुलेची (Samir Choughule) लोकप्रियता दिवसागणिक वाढते. समीर हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे आपण पाहतो. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत समीर चाहत्यांच्या संपर्कात राहतो. या सगळ्यात समीरनं नुकताच त्याचा एक 25 वर्षे जुना फोटो शेअर केला आहे. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

समीरचा हा फोटो 25 वर्षे जुना म्हणजेच 1997 सालातील जवळपास तारुण्यातील आहे. समीरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत समीरनं पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत समीरनं कॅप्शन देत त्याची आठवण शेअर करत सांगितलं की पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेमुळे आम्हाला आणि तुम्हांलाही 90 च्या काळात नेलं. तर हा आहे माझा 1997 मधील फोटो. तुम्हीही तुमचा 1997 मधील फोटो पोस्ट करा सोनी मराठी वहिनीला टॅग करा आणि #PostOfficeUghadAahe हा हॅशटॅग वापरा,' असं कॅप्शन दिलं आहे. समीरचा हा फोटो सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. 

पाहा फोटो - 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : लग्नाच्या 6 वर्षांनंतर ‘दृश्यम 2’ फेम अभिनेत्रीनं दिली Good News, फोटो शेअर करत म्हणाली...

दरम्यान, समीर चौघुलेच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमासोबतच तो ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ या मालिकेतही दिसतो. या मालिकेत 90 च्या दशकातील पोस्ट ऑफिसचा काळ कसा होता ते दाखवण्यात आलं आहे. गेल्या 3 महिन्यांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आता तीन महिन्यांनंतर चॅनलने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या म्हणजे 2 एप्रिल रोजी आपल्याला या मालिकेचा शेवटचा भाग पाहायला मिळणार आहे. या मालिकेमध्ये समीर चौघुले, दत्तू मोरे, वनिता खरात, शिवाली परब, प्रभाकर मोरे, ईशा डे, पृथ्वीक प्रताप, आशुतोष वाडेकर यांबरोबरच ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे प्रमुख भूमिकेत दिसून आले.