'माझ्या बायकोचा प्रियकर' सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर

पाहा हा अफलातून ट्रेलर 

मुंबई : आतापर्यंत माझ्या नवऱ्याची प्रियसी किंवा माझ्या नवऱ्याची बायको ही गोष्ट ऐकली असेल पण पहिल्यांदाच माझ्या बायकोचा प्रियकर अशी हटके कथा पाहायला मिळणार आहे. नुकतंच लग्न झालेल्या जोडप्याची लग्नानंतरची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हॉरर कॉमेडी अशा या जॉनरचा हा सिनेमा आहे. या सिनेमातून अनिकेत विश्वासराव आणि प्रियदर्शन जाधव ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

राजकला मुव्हीज अॅण्ड बाबा मोशन पिक्चर्स प्रा. लि.या बॅनरखाली निर्मिती करण्यात आलेल्या 'माझ्या बायकोचा प्रियकर' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. अनेक हिंदी व मराठी सिनेमांचे दिग्दर्शन करणारे राजीव एस. रुईया यांनी सिनेमाची कथा लिहिली असून दिग्दर्शनही केले आहे.

या सिनेमाच्या ट्रेलरप्रमाणेच गाणी देखील प्रेक्षकांच्या पसंतीला पडत आहे. 'तू हाथ नको लावूस' या पहिल्या गाण्याला सोशल मीडियावर खूप पसंती मिळाली आहे. हा सिनेमा 23 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x