'मला पुन्हा खान कुटुंबाची सून व्हायला आवडेल' मलायका अरोराचं वक्तव्य चर्चेत..

मलायका अरोरा आणि अरबाज खान ही जोडी एकेकाळी टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडी होती.

Updated: Jun 13, 2022, 06:59 PM IST
'मला पुन्हा खान कुटुंबाची सून व्हायला आवडेल' मलायका अरोराचं वक्तव्य चर्चेत.. title=

मुंबई : मलायका अरोरा आणि अरबाज खान ही जोडी एकेकाळी टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडी होती. मात्र, आज हे दोघं एकत्र नाहीत. मलायका आणि अरबाज एका फोटोशूट दरम्यान भेटले होते आणि इथेच ते पहिल्याच नजरेत प्रेमात पडले होते.

1998 मध्ये त्यांचं लग्न झालं आणि या लग्नातून त्यांना मुलगा अरहान खान झाला. मात्र, लग्नाच्या काही वर्षानंतर मलायका आणि अरबाज यांच्यातील मतभेद वाढू लागले. त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला. मात्र, आज आम्ही तुम्हाला मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला नव्हता तेव्हाचा किस्सा सांगणार आहोत.
 
'कॉफी विथ करण' या लोकप्रिय चॅट शोमध्ये दोघंही उपस्थित होते. यादरम्यान, करण जोहरसोबतच्या संभाषणात मलायका म्हणाली होती की, तिचे सासरे खूप चांगले आहेत. ते खूप सपोर्टिव्ह आहेत. ते खूप आदराने वागतात.

जर तिला पुन्हा एकदा संधी मिळाली तर तिला पुन्हा खान कुटुंबाची सून व्हायला आवडेल. मात्र, तिच्या नशिबाला काहीतरी वेगळं हवं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मलायका आणि अरबाज 2016 पासून वेगळे राहू लागले. त्याचबरोबर, 2017 मध्ये, त्यांचा अधिकृतपणे घटस्फोट झाला.

घटस्फोटानंतर मलायका आणि अरबाज आपापल्या आयुष्यात सेट झाले आहेत. मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत असताना, अरबाज खान इटालियन मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.