बॉयफ्रेंडच्या नादात Malaika Arora ला राहत नाही मुलाचं ही भान, जे केलं ते व्हिडिओत कैद

मलायकाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, लोक तिच्या व्हिडिओवर कमेंट करत आहेत.

Updated: Jan 1, 2022, 12:55 PM IST
 बॉयफ्रेंडच्या नादात Malaika Arora ला राहत नाही मुलाचं ही भान, जे केलं ते व्हिडिओत कैद title=

मुंबई : करीना कपूर, दिया मिर्झा, शिल्पा शेट्टी, सारा अली खान खाननंतर आता मलायका अरोरा हिने देखील 2021 चा निरोप घेत पोस्ट शेअर केली आहे. मलायकाने वर्षाच्या शेवटच्या दिवशी तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने 2021 चे खास क्षण समाविष्ट केले आहेत.

हे खास क्षण मलायकाने 12 महिन्यांनुसार तिचे एकूण 12 वेगवेगळे अवतार चाहत्यांना दाखवले आहेत. या व्हिडिओमध्ये ती कधी वाळूवर चालताना दिसत आहे तर कधी तिचा प्रियकर अभिनेता अर्जुनच्या मिठीत दिसत आहे.

एकंदरीत मलायका व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या स्टाईलमध्ये बोल्ड अंदाजात दिसत आहे. मात्र, मलायकाच्या फोटोमध्ये तिचा लाडका मुलगा अरहान कुठेच दिसत नाही. मलायकाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, लोक तिच्या व्हिडिओवर कमेंट करत आहेत.

मलायकाचा खास व्हिडिओ

मलायकाच्या पोस्टची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिने जानेवारी ते डिसेंबर या 2021 च्या सुंदर आठवणींना उजाळा देत एक व्हिडिओ बनवला आहे. या रीलमध्ये एकूण 12 फोटो आहेत, ज्यामध्ये मलायका वेगवेगळ्या पोशाखांमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी दिसत आहे. या रील व्हिडिओमध्ये मलायका कधी बीचवर पार्टी करताना, कधी काहीतरी खाताना तर कधी हवेत वाळू उडवताना दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याशिवाय एका फोटोमध्ये ती बॉयफ्रेंड अर्जुन कपूरच्या मिठीत दिसत आहे. या सगळ्यामध्ये मलायकाने तो फोटो देखील समाविष्ट केला आहे ज्यामध्ये ती कोविड-19 लस घेताना दिसत आहे, पण हे खास क्षण शेअर करत असताना  व्हिडिओमध्ये तिचा मुलगा कुठूच दिसत नसल्याने तिला ट्रोल करण्यात येत आहे.

ऑगस्टमध्ये मुलासोबतचा हा फोटो शेअर 

ऑगस्टमध्ये मलायकाने तिच्‍या इंस्‍टाग्रामवर मुलगा अरहानसोबतचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्‍ये दोघे बाल्कनीत उभे आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा फोटो शेअर करताना मलायकाने चाहत्यांना सांगितले की, अरहान त्याच्या उच्च शिक्षणासाठी परदेशात जात आहे. हा फोटो शेअर करून मलायका खूपच भावूक झाली. पण आता तिचा मुलगा 'इयर ऑफ मेमरी 2021' व्हिडिओमध्ये कुठेही दिसत नाही.