malaika arora रेस्टॉरेंटमधून बाहेर येताना जीन्स वर करायला विसरली आणि...

अभिनेत्री मलायका अरोरा यावेळी चित्रपटांपासून नक्कीच दूर आहे पण 

Updated: Sep 29, 2021, 12:39 PM IST
 malaika arora रेस्टॉरेंटमधून बाहेर येताना जीन्स वर करायला विसरली आणि... title=

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा यावेळी चित्रपटांपासून नक्कीच दूर आहे पण टीव्ही शो, फोटो, व्हिडिओ आणि वक्तव्यांमुळे ती चर्चेत आहे. मलायकाची फॅन फॉलोविंग खूप मोठी आहे. या दिवसांमध्ये, सुपरमॉडेल ऑफ द इयरमध्ये परिक्षक म्हणून काम करणारी मलायका हिने इन्स्टाग्रामवर एक किस्सा शेअर केला आणि सांगितले की, त्यावेळी कोरोनाच्या भीतीमुळे लोकांच्या मनात भीती होती.

प्रत्येकजण विचार करुन प्रत्येक पाऊल उचलत होते. मी एका रेस्टॉरंटमध्ये गेले. तेथे हाताच्या कोपराने दरवाजा उघडला. पायाने टॉयलेट सीट उचलली. बाहेर आले. हात धुतले. टीशू पेपर वापरला. मग बाथरूमचा दरवाजा उघडला आणि परत टेबलवर आले. मग अचानक लक्षात आले की मी जिन्स वर करायला विसरले होते.

याआधी मलायका मुलांबद्दल तिच्या निवडीबद्दल सांगत होती. मलायका अरोराने तिला पुरुषांमध्ये काय आवडते ते सांगितले.