मलायका आणि अर्जून कपूरनं बांधली लग्न गाठ? सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताच खळबळ

त्यात आता मलायकानं अर्जुनसोबत लग्न केल्याच्या बातम्या समोर आल्या.

Updated: Jun 5, 2022, 05:28 PM IST
मलायका आणि अर्जून कपूरनं बांधली लग्न गाठ? सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताच खळबळ title=

मुंबई : प्रत्येक वेळी आपल्या स्टाईलने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या मलायका नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी काही ना काही पोस्ट करत असते. ती काय करते कुठे जाते याबद्दल देखील ती नेहमी पोस्ट करत असते. मलायका आणि अर्जुन कपूर हे एकमेकांना अनेक वर्षांपासून डेट करत आहेत आणि त्यांनी ही गोष्ट जगापुढे देखील उघडपणे ठेवली आहे. त्यानंतर हे दोघं कधी लग्न करतील, याकडे त्यांच्या चाहत्यांना नजरा आहे.
 
त्यात आता मलायकानं अर्जुनसोबत लग्न केल्याच्या बातम्या समोर आल्या. मलायकानं रातोरात लग्न करण्याचा का निर्णय घेतला? किंवा तिने या बाबत सोशल मीडिया किंवा मीडियाला का सांगितले नाही? अशी सर्वत्र चर्चा सुरु आहे.

परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की खरंतर ही सगळी चर्चा सुरु झाली. मलायकाच्या त्या व्हिडीओमुळेच...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नेहमी वेस्टन आणि स्टाईलीश दिसणारी मलायका लोकांना इंडियन आणि ट्रेडिश्नल ड्रेसवर दिसली. शिवाय तिनं लाल रंगाचा सुट म्हणजेच़ ड्रेस घातला आहे. तर लाल रंगाचा चुडा देखील हातात भरला आहे. एवढंच काय तर मलायकानं डोक्याला टिकली देखील लावली आहे. तिच्या या एका व्हिडीओने सर्वत्र गोंधळ उडवून दिला.

तिला या स्टाईलमध्ये पाहून तिचं लग्न झालं की काय असा प्रश्न अनेकांना पडला. परंतु असे काहीही नाही.

अभिनेत्रीने स्वत:हे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केलं आहे. तुर्कस्तानमध्ये सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी ती गेली असतानाचा व्हिडीओ तिने शेअर केला. त्यादरम्यान तिनं ही स्टाईल केली आहे. ज्यामध्ये ती नववधू प्रमाणे तयार झालेली दिसत आहे.