मलायकाकडून अर्जुन कपूर संबधित गुपित उघड म्हणाली Best Kisser...

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपल आहेत. 

Updated: Sep 23, 2021, 04:01 PM IST
मलायकाकडून अर्जुन कपूर संबधित गुपित उघड म्हणाली Best Kisser...

मुंबई : अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपल आहेत. माध्यमांमध्ये आणि चाहत्यांमध्ये या दोघांच्या नात्याची चर्चा कायमच सामन्य आहे. अधिकृतपणे त्यांचे संबंध उघड केल्यानंतर, ते दोघंही लोकांसमोर मोठ्या सहजतेने दिसतात आणि जोडपं कपल गोल पूर्ण करतात. दोघं सहसा वेकेशन आणि डिनर डेट्सवर एकत्र जातात. आता मलायकाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती अर्जुन कपूरसह तिच्या वैयक्तिक आवडीबद्दल सांगत आहे. ज्याची सगळीकडे चर्चा होत आहे.

मलायका अरोरा एमटीव्ही शो 'सुपरमॉडेल ऑफ द इयर सीझन 2' मध्ये पाहूणी म्हणून सामील झाली होती. मिलिंद सोमण या शोला होस्ट करतो. MTV च्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हायरल व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या 38 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये मिलिंद तिला विचारतो की, तिचा आयडियल मॅन कसा असावा. यावर मलायका म्हणाली, 'मला खरंच रफ मुलं आवडतात. जो भयंकर पद्धतीने फ्लर्ट करतो. जो किस घेऊ शकतो मला सुंदर मुलं आवडत नाहीत.'

मलायकाने शोमध्ये असंही सांगितलं की, अर्जुन कपूर तिला सर्वोत्तम किस करतो. मिलिंद सोमणने मलायकाला पुढे विचारलं की, तिने अर्जुन कपूरला पाठवलेला शेवटचा मॅसेज काय होता? यावर मलायका लाजली आणि म्हणाली, "आय लव्ह यू 2." मिलिंदने पुन्हा विचारलं तुला कोण चांगलं ओळखतं? या प्रश्नाच्या प्रत्युत्तरात मलायकाने अर्जुन कपूरचं नाव घेतलं. सेलिब्रिटी क्रशच्या प्रश्नावर मलाइकाने डॅनियल क्रेगचे नाव घेतलं. जेम्स बाँड सिरीजमध्ये डॅनियल बॉण्डची भूमिका साकारत आहे.

मलायकाचा फिमेल क्रश बेला हदीद आहे. जी अमेरिकन मॉडेल आहे. 2016 मध्ये ती अमेरिकेची 'मॉडेल ऑफ द इयर' बनली. ती आता 24 वर्षांची आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या लग्नाच्या बातम्या अनेकवेळा समोर आल्या आहेत. मात्र दोन्ही कलाकार नेहमी लग्नाचे प्रश्न पुढे ढकलतात. अर्जुन आणि मलायका एकमेकांना तीन वर्षांहून अधिक काळ डेट करत आहेत.