Malaika Arora चं अतिशय क्यूट आहे निक नेम, ऐकल्यावर तुम्हालाही वाटेल...

मलाइकाची पुन्हा एकदा चर्चा 

Updated: Oct 17, 2021, 08:28 AM IST
Malaika Arora चं अतिशय क्यूट आहे निक नेम, ऐकल्यावर तुम्हालाही वाटेल...

मुंबई : 'इंडियाज बेस्ट डान्सर 2' (India's Best Dancer 2) च्या सेटवर अभिनेत्री आणि डान्सर मॉडेल मलाइका अरोरा (Malaika Arora) कायमच चर्चेत असते. मलाइका आता चर्चेत आहे ते तीच्या निक नेममुळे. स्पर्धक मेयितेम्सु नागा  (Mayitemsu Naga)ने कार्यक्रमातील ऑडिशन राऊंडमध्ये 'इश्क वाला लव' या गाण्यावर परफॉर्म केलं. या परफॉर्ममुळे त्याची खूप चर्चा झाली. यावेळी मेयितेम्सुने यावेळी आपलं निक नेम शेअर केलं. 

निकनेमचं गुपित असं उलघडलं 

मेयितेम्सूने जजला सांगितले की तो हिंदी बोलू शकत नाही. फक्त इंग्रजी किंवा त्याची मातृभाषा अंगमी बोलू शकतो. परिक्षकांना मेयिम्सुचे नाव बोलण्यात अडचण येत असल्याने त्याने तिला 'मिमी' म्हणण्यास सांगितले आणि म्हणाला की, 'हे माझे टोपणनाव आहे.' यावर मलाइकाला आपल्या टोपण नावाची आठवण झाली. कारण मलाइकाला देखील तिच्या घरी 'मिमी' याच टोपण नावाने हाक मारता. मलाइकाचं हे नाव एकून सगळे हैराण झाले. 

यावर मलाइकाला आपल्या टोपण नावाची आठवण झाली. कारण मलाइकाला देखील तिच्या घरी 'मिमी' याच टोपण नावाने हाक मारता. मलाइकाचं हे नाव एकून सगळे हैराण झाले. मलाइकाने शेअर केला खास अनुभव. आपल्या अनुभवाबद्दल बोलताना मेयितेमसू म्हणाला की, 'नृत्य हा माझा छंद आहे. मला खूप आनंद झाला की जजने माझ्या डान्सचं कौतुक केलं. मी माझ्या परफॉर्मन्समधून आई-वडिलांना आनंद देऊ शकले तर माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे.