मलायकाच्या फॅशनवर मुलाचं मोठं वक्तव्य ट्रोल करत म्हणाला, 'तु जेलच्या कैदी..'

अरहान हा मलायका आणि अरबाजचा मुलगा आहे. काहि वर्षांपुर्वी या जोडीने घटस्फोट घेतला. 

Updated: Dec 21, 2022, 08:38 PM IST
मलायकाच्या फॅशनवर मुलाचं मोठं वक्तव्य ट्रोल करत म्हणाला, 'तु जेलच्या कैदी..' title=

मुंबई : मलायका अरोरा ही या दिवसांत शो मूविंग इन विद  (Moving In with Malaika) मलायका (Malaika Arora) ला घेवून चर्चेत आहे. या शोमध्ये ती स्वत: होस्ट करते. गेल्या अनेक एपिसोडमध्ये मलायका स्वत: म्हणाली आहे की, कधी तिला तिच्या  कपड्यांवरुन ट्रोल केलं तर कधी तिच्या वयावरुन ट्रोल करण्यात आलं. असं ती म्हणाली. मात्र याचा तिला कधीच कसलाच फरक पडला नाही. मात्र यावेळी मुलगा अरहाननेच आईला ट्रोल केलं. अरहानने आई मलायकाच्या ड्रेसला टेबल नॅपकिन म्हटलं ज्यामुळे मलायकासोबतच सगळे हैराण झाले. 

'मूविंग इन विद मलायका'च्या एपिसोडमध्ये मलायकाचा मुलगा अरहानही दिसला आहे. यावेळी मलायकाने ब्लॅक अँण्ड व्हाईट टॉपमध्ये दिसली. जो टेबल नॅपकिनला मिळता-जुळता आहे. एवढंच नव्हेतर या ड्रेस आणि नॅपकिन्सचा पॅटर्न मॅच होत आहे.

नॅपकिनशी केली जातेय मलायकाच्या ड्रेसशी तुलना
मलायका अरहानला तिचा रुम दाखवतो. जो फ्लावर्सने डेकोरेट केली आहे. यानंतर अरहान आणि मलायका लंच करण्यासाठी डायनिंग टेबलवर बसतात. यावेळी मालायकाची आईदेखील तिथे उपस्थित आहे. तेव्हाच अरहान मलायकाला म्हणतो. तु असा ड्रेस का घातला आहेस जो टेबल नॅपकिन सारखा दिसत आहे. हे ऐकून सगळेच हसू लागतात.
 
यानंतर मलायका (Malaika Arora) अरहान  (Arhaan Khan) म्हणतो की, हे तू जाणून बुझून केलं आहेस. यावर मलायका म्हणते, मी असं का करेन मी अज्जिबात असं केलं नाही. यावर अरहान पुढे म्हणतो, तु जेलच्या कैद्यासारखी दिसत आहेस. यावर मलायकाची आई पुढे म्हणते हो खरंच तु तशीच दिसत आहेस कारण ते देखील तसेच कपडे घालतात.'' सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अरहान हा मलायका आणि अरबाजचा मुलगा आहे. काहि वर्षांपुर्वी या जोडीने घटस्फोट घेतला. मलायका आता अर्जून कपूर (Arjun Kapoor) ला डेट करत आहे. बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. हे दोघं सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात.