अर्जुन कपूरची नवीन कार घेऊन मलायकाची एअरपोर्टवर एन्ट्री

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा गेल्या 3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

Updated: Jul 30, 2021, 11:10 PM IST
अर्जुन कपूरची नवीन कार घेऊन मलायकाची एअरपोर्टवर एन्ट्री

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि  मलायका अरोरा अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसतात.बऱ्याचदा ही जोडी बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत पार्टीमध्ये एकत्र दिसते.  मलायका अरोरा अर्जुन कपूरच्या नवीन कारमध्ये मुंबई एअरपोर्टवर पोहोचली. जिथे आधी प्रत्येकाला वाटले होते की अर्जुन या कारमधून उतरत आहे, पण जेव्हा मलायका या कारमधून खाली उतरली तेव्हा सगळे तिच्याकडे नजरा तिच्यावर टिकून होत्या.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा गेल्या 3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. संपूर्ण बॉलिवूडला त्यांच्या नात्याबद्दल माहिती आहे. मलायका अरोरा विमानतळावर पोहोचताच तिचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर्सची एकच गर्दी झाली.

मलायका एअरपोर्टवर  स्पोर्टी लुक केला होता. मलायकाने यावेळी स्पोर्ट्स ब्रा आणि जीन्स घातली होती, सोबत तिने ऑरेंज कलरचं ओव्हर साईज जॅकेट घातला होता. अभिनेत्रीने एअरपोर्टवर एन्ट्री करताच तिच्या स्टाईलिश अंदाने  सगळ्याचंच लक्षवेधून घेतलं.