एकेकाळी ट्रेनने प्रवास करणार सोनू निगम आहे एवढ्या कोटींचा मालक

सोनू निगमला कार आणि बाईकचीही खूप आवड आहे. 

Updated: Jul 30, 2021, 10:36 PM IST
एकेकाळी ट्रेनने प्रवास करणार सोनू निगम आहे एवढ्या कोटींचा मालक

मुंबई : सोनू निगमला कोण ओळखत नाही, जो आपल्या मखमली आवाजाने चाहत्यांना वेड लावतो. अनेक गाण्यांना आपला आवाज देऊन सोनूने त्या गाण्यांना त्याने कायमचं अमर केलं आहे. सोनू एक असा गायक आहे जो रोमँटिक पासून ईमोशनल पर्यंत सगळ्या प्रकारची गाणी चाहत्यांसमोर सादर करतो. पण तुम्हाला माहित आहे का की, हा गायक करोडोच्या संपत्तीचा मालक आहे. चाहत्यांमध्ये सोनूची गाणी नेहमीच पसंत केली जातात. गाण्याबरोबरच सोनू अनेक शोमध्ये जज म्हणूनही दिसला आहे. अशा परिस्थितीत २०२१मध्ये सोनू निगमची एकूण मालमत्ता 50 मिलीयन डॉलर्स म्हणजेच करोडो रुपयांची आहे.पण हा सगळा प्रवास सोनू निगमसाठी सोपा नव्हता. सोनूने आयुष्यात थुप स्ट्रगल केलं आहे. एवढच नव्हे तर त्याने ट्रेनने देखील प्रवास केला आहे.

सोनूची गाणी चाहत्यांच्या नेहमीच पसंतीस उतरतात. अशा स्थितीत त्याची कमाईही कोटींमध्ये झाली आहे. सोनूकडे बऱ्याच गाड्या आणि घरं आहेत. अशा परिस्थितीत, आज गायकाच्या वाढदिवशी, त्याच्या संपत्तीशी संबंधित आकडेवारीवर एक नजर टाकूया.

सोनू निगमची संपत्ती 50 मिलीयन आहे. इतकंच नाही तर सोनूची मासिक कमाई दोन कोटींपेक्षा जास्त असल्याचं म्हटलं जातं. सोनूची संपत्ती दरवर्षी वाढत असते. सोनूकडे कमाई करण्याचे वेगवेगळी साधन आहे. गाणी आणि थेट कार्यक्रम रेकॉर्डिंग व्यतिरिक्त तो प्रायोजकत्वातूनही चांगली कमाई करत आहे.

सोनू निगमची कार आणि बाईक कलेक्शन
सोनू निगमला कार आणि बाईकचीही खूप आवड आहे. त्याच्याकडे सर्वात महागडी कार रेंज रोव्हर आहे, ज्याची किंमत 2.11 कोटी रुपये आहे. याशिवाय, सोनूकडे डीसी अवती, ऑडी ए 4, रेंज रोव्हर वॉज, बीएमडब्ल्यू झेड या कारदेखील आहेत.