अर्जून कपूरला नव्हेतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्याला स्टॉक करते अभिनेत्री मलायका अरोरा

आयटम साँगमधून लोकप्रियता मिळवणारी मलायका अरोरा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. 

Updated: Aug 31, 2022, 09:52 PM IST
अर्जून कपूरला नव्हेतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्याला स्टॉक करते अभिनेत्री मलायका अरोरा title=

मुंबई : आयटम साँगमधून लोकप्रियता मिळवणारी मलायका अरोरा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती दररोज तिच्या पोस्टद्वारे चाहत्यांना अपडेट करत असते. ग्लॅमरस फोटोशूट असो किंवा 'नो फिल्टर क्लासिक' फोटो सोशल मीडियावर काही वेळातच व्हायरल होतात. मलायका ही बॉलिवूडमधील स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. अरबाजपासून विभक्त झाल्यानंतर मलायका बोनी कपूरचा मुलगा अर्जुन कपूरला डेट करत आहे. पण मलायका सोशल मीडियावर दुस-याला स्टॉक करते.

फिल्मफेअर अवॉर्ड्स 2022 मध्ये, जेव्हा मलायकाला एका मुलाखतीत विचारण्यात आलं की, ती सोशल मीडियावर कोणाला स्टॉक करते, तेव्हा मलायकाने लाजून सांगितलं की ती हॉलिवूडचा सुपरस्टार टॉम क्रूझला सोशल मीडियावर स्टॉक करते. तसंच तिने सांगितले की ती टॉम क्रूझचं खूप कौतुक करते. 

मलायका टॉमवर क्रश आहे
टॉम क्रूझ नेहमीच मलायका अरोराचा क्रश राहिला आहे. अभिनेत्री तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिचे फोटो शेअर करत असते. अलीकडेच मलायकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा आणि टॉम क्रूझचा एक फोटो शेअर केला आहे. मलायकाने पोस्टसोबत टॉम अँड हार्ट इमोजी लिहिलं. ही पोस्ट एका फॅन पेजनेही शेअर केली आहे.

अनेकदा टॉमचे फोटो शेअर करते
या वर्षी मे महिन्यात देखील मलायकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये टॉमचा फोटो शेअर केला होता आणि 'माय फॉरेव्हर फेव्हरेट' असं लिहिलं होतं. 2021 मध्ये, मलायकाने टॉम क्रूझच्या फोटोंचा कोलाज बनवला आणि तो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. ज्यामध्ये अभिनेत्रीला दाखवायचं होतं की वाढत्या वयासोबत टॉम कसा अधिक सुंदर होत आहे.