भर गर्दीत अज्ञात इसमानं अभिनेत्रीला पकडलं आणि... वाचून डोळे गच्च मिटाल

सुरक्षा रक्षकांचं कवच असतानाही अभिनेत्रीसोबत घडला असा धक्कादायक प्रकार  

Updated: Sep 28, 2022, 03:03 PM IST
भर गर्दीत अज्ञात इसमानं अभिनेत्रीला पकडलं आणि... वाचून डोळे गच्च मिटाल  title=

Actress Sexual Assualt : सामान्य मुलींना रोज कोणत्या न कोणत्या वाईट घटनेचा सामना करावा लागतो. असे प्रकार फक्त सर्वसामान्य मुलींसोबतच नाही तर, अभिनेत्रीसोबत देखील होत असतात. पण अशा घटनांना वाचा फोडणाऱ्या फार कमी महिला असतात. इन्स्टाग्रामवर एका अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. तिच्यासोबत अज्ञात इसमाने केलेलं कृत्य वाचून तुम्हीही डोळे घट्ट मिटून घ्याल. 

अभिनेत्रीने व्यक्त केली खंत 
एका मल्लाळम अभिनेत्रीने (malyalam actress) लैंगिक शोषणावर तिव्र नाराजी आणि चिंता व्यक्त केली आहे. मंगळवारी रात्री मॉलमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान अभिनेत्रीला धक्कादायक अनुभव आला.  असा अनुभव फक्त अभिनेत्रीनेच नाही तर, तिच्यासोबत असेलल्या एका अभिनेत्रीने देखील आला आहे.  (sexual assualt)

actress

अभिनेत्रीनं पोस्टमध्ये लिहिलं, 'कोझिकोड हे असं एक ठिकाण आहे जे मला प्रचंड आवडतं. पण, आज रात्री एका कार्यक्रमानंतर घरी परतत असताना एका व्यक्तीने मला गर्दीत पकडलं. चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मी अनेक ठिकाणी जाते. पण, इतका वाईट अनुभव मला इतर कुठेही आला नाही.' (sexual assualt during film promotion in mall)

पुढे अभिनेत्री म्हणाली, 'मॉलमध्ये सुरक्षा रक्षण गर्दी नियंत्रिक करत होते, पण त्या अज्ञात इसमाने फक्त माझ्यासोबतच नाही तर, आणखी एका महिलेसोबत गैरवर्तण केलं आहे. पण ती काही बोलू शकली नाही.'

पुढे असा प्रसंग कोणावर येवू नये.... असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या याप्रकरणी चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x