close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'सैराट' फेम गायिकेकडे सोशल मीडियावरुन न्यूड फोटोची मागणी

या गायिकेला सोशल मीडियावर एका व्यक्तीने न्यूड फोटो पाठवण्याचे सांगितलं.

Updated: May 22, 2019, 12:03 PM IST
'सैराट' फेम गायिकेकडे सोशल मीडियावरुन न्यूड फोटोची मागणी

मुबंई : सोशल मीडियावर सहजपणे कलाकारांशी संवाद साधता येतो. सामान्यांसाठी ही सुखद, आनंददायी गोष्ट असली तरी हा संवाद कलाकारांसाठी अनेकदा त्रासदायक ठरतो. अनेक चाहते सोशल मीडियावरुन आवडत्या कलाकाराशी संवाद साधतात तर अनेकदा काही लोक आपल्या मर्यादा ओलांडून कलाकारांना सोशल मीडियावर कमेंट, मेसेज करत असतात. नुकताच एका गायिकेसह असा प्रकार घडला आहे. 

प्रसिद्ध गायिका चिन्मयी श्रीपदा हिला सोशल मीडियावर एका व्यक्तीने न्यूड फोटो पाठवण्याचे सांगितलं. यावर गप्प राहण्यापेक्षा या गायिकेने त्या व्यक्तीला जबरदस्त उत्तर देत सर्वांसमोर आणलं आहे. चिन्मयी श्रीपदाच्या उत्तराने असा प्रकार करणाऱ्या अनेकांना चांगलीच शिकवण मिळणार आहे. न्यूड फोटोची मागणी करणाऱ्याला चिन्मयी श्रीपदाने दिलेल्या उत्तराची सोशल मीडियावर चांगलीच प्रशंसा केली जात आहे.

फोटोची मागणी करणाऱ्याला चिन्मयीने न्यूड रंगाच्या लिपस्टिकच्या काही शेड्स पाठवत त्याला 'माझ्या काही आवडत्या न्यूड' असं कॅप्शन दिलं आहे. चिन्मयीच्या उत्तरानंतर त्या व्यक्तीने ट्विटर अकाउंट डिलीट केलं असून तो ट्विटरवरुन गायब झाला आहे. 

न्यूड लिपस्टिक म्हणजे स्किन कलरच्या, आपल्या त्वचेच्या रंगासारख्या लिपस्टिक. स्किन टोननुसार, त्वचेच्या रंगानुसार बाजारात या लिपस्टिकचे अनेक शेड्स मिळतात. इतर रंगांपेक्षा हा रंग वेगळा दिसतो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chinmayi Sripada (@chinmayisripaada) on

चिन्मयीने याआधी एका तमिळ गीतकारावर लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला होता. हे प्रकरण दाबण्यासाठी चिन्मयीला धमकी देऊन तडजोड करण्याबाबत सांगितलं असल्याचं चिन्मयी यांनी म्हटलं होतं. 'सैराट' चित्रपटातील 'सैराट झालं जी'  या गाण्यासह चिन्मयीने अनेक बॉलिवुड चित्रपटात गाणी गायली आहेत.