Manike Mage Hithe: श्रीलंकेची गायिका योहानीने सलमान खानकडे मागितली 'ही' गोष्ट

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा अंदाज रिअ‍ॅलिटी टीव्ही शो बिग बॉस 15 ला आणखी खास बनवतो. 

Updated: Oct 10, 2021, 10:03 AM IST
 Manike Mage Hithe: श्रीलंकेची गायिका योहानीने सलमान खानकडे मागितली 'ही' गोष्ट

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा अंदाज रिअ‍ॅलिटी टीव्ही शो बिग बॉस 15 ला आणखी खास बनवतो. सलमान खान गेल्या अनेक वर्षांपासून शो होस्ट करत आहे आणि त्याच्या कॉमेडीपासून ते त्याच्या रागापर्यंत प्रत्येक गोष्ट या रिअ‍ॅलिटी शोला अधिक टीआरपी मिळवण्यासाठी मदत करत आहे. नुकताच आता सलमान खानचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सलमानने योहानीसोबत गायले गाणे 

बिग बॉस 15 च्या या व्हायरल व्हिडिओमध्ये दबंग खान श्रीलंकेची प्रसिद्ध गायिका योहानीसोबत मणिहारी गाणे गाताना दिसत आहे. कलर्स टीव्हीने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात योहानी दबंग खानला विचारते की, हे गाणे तिच्यासोबत गायला आवडेल का? सलमान खानच्या संमतीने ती प्रत्येक ओळ गाते आणि सलमान त्याची कॉपी करतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

सलमान खानने बदलूनच टाकला गाण्याचा सूर 

पण गाणे हिंदी किंवा इंग्रजीमध्ये नसल्यामुळे, नंतर सलमान खानला हे गाणं बोलणं जरा कठीणच गेल्याचं दिसलं. तो गाण्याचे  वेगळ्या पद्धतीने उच्चारू लागला होता. सलमान खान असे गाताना पाहून योहानीला हसू आवरता येत नाही.