मीरा कपूरच्या 'त्या' कृतीने मनीष मल्होत्रा Awkward, Watch Video

Awkward Moment : करण जोहर, मनीष मल्होत्रा आणि मीरा कपूर हे तिघे एका कार्यक्रमात एकत्र दिसले. या वेळेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पाहा नेमकं काय घडलं?

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 8, 2024, 11:29 AM IST
मीरा कपूरच्या 'त्या' कृतीने मनीष मल्होत्रा Awkward, Watch Video

दिग्दर्शक करण जोहर, डिझाइनर मनीष मल्होत्रा आणि मीरा कपूर हे तिघेही एका कार्यक्रमात एकत्र स्पॉट झाले. तिघांचा एकत्र असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

मीरा कपूर, मनीष मल्होत्रा आणि करण जोहर कॅमेऱ्यात पोझ देण्यासाठी एकत्र आले. यावेळी मीरा कपूरने निळ्या रंगाचा ड्रेस कॅरी केला होता तर मनीष मल्होत्रा काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये अतिशय सुंदर दिसत होता. करण जोहर बिच रंगाच्या फॉर्मलमध्ये होता. चाहत्यांनी तिघांना एकत्र बघून आनंद व्यक्त केला. या दरम्यानचा जो व्हिडीओ व्हायरलय झालाय त्यामध्ये मनीष मल्होत्राचा एक ऑकवर्ड क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. डिजीटल क्रिएटर मानव मंगलानीने हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. 

यावेळी मीरा कपूर मनीष मल्होत्रासोबत चालत येताना दिसतेय. त्यानंतर करण जोहर फोटोला पोझ देत असताना मीरा मनीष आणि करण यांच्या पाठीवर हात ठेवते. तेव्हा मनीष मल्होत्राला अतिशय ऑकवर्ड वाटतं आणि तो मीराचा हात पाठीवरुन काढून पुढे करतो आणि पोझ देतो. मनीषचा हा ऑकवर्ड क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

करण जोहर, मनीष मल्होत्रा आणि मीरा कपूर तिघेही आंतरराष्ट्रीय स्किन ब्रँड Augustinus Bader च्या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी मीरावर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या निळ्या रंगाचा सिव्हलेस ड्रेस, सिंपल मेकअप आणि गोल्डन स्टँडल अशा लूकमध्ये मीरा कपूर दिसली. 

मीरा कपूर नुकतीच शाहीद कपूरसोबत व्हॅकेशनवरुन आली आहे. मीराने व्हॅकेशनचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. यावेळी तिने शाहीद कपूरसोबत खास बुमरँग व्हिडीओ देखील शेअर केला होता. 

बॉलिवूडमधील लोकप्रिय डिझाइनर मनीष मल्होत्राने नुकतंच मुंबईत एक नवीन स्टोर लाँच केलं. यावेळी बी-टाऊनमधील सर्व दिग्गज कलाकार उपस्थित होते. रेखा, काजोल, कृति सेनन, गौरी खान, नीता अंबानी, शिल्पा शेट्टी, करण जोहर यांच्यासह नवोदित कलाकार देखील उपस्थित होते. खुशी कपूर देखील यावेळी स्पॉट झाली. 

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More