Manoj Pahwa Akshay Kumar : 'ऑफिस ऑफिस' मधून स्वत: ची ओळख मिळवणारा अभिनेता म्हणजे मनोज पाहवा लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. त्यांच्या नव्या प्रोजेक्टचं नाव 'आईसी 814: द कंधार हायजॅक' मध्ये दिसणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मनोजनं हिंदी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांच्या मेहनतीला घेऊन काही गोष्टी सांगितल्या आहेत. मनोजनं सांगितलं की हा कलाकार त्यांच्या कामाला घेऊन समर्पित राहतात.
मनोज पाहवानं अक्षय कुमारसोबत 'सिंग इज किंग' चित्रपटात काम केलं होतं. या कॉमेडी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा अनुभव सांगताना मनोज यांनी सांगितलं की ऑस्ट्रेलियामध्ये एक महिनाभर शूटिंग सुरु होती आणि ते रोज पार्टी करायचे. मनोज आणि चित्रपटातील इतर कलाकारांसोबत अक्षय कुमार देखील तिथे उपस्थित असायचा.
मनोज पाहवानं हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की सगळे लोक मज्जा करत होते. पण अक्षय कुमार रात्री 9 वाजता झोपायला जायचे आणि इतकंच नाही तर तो दारू देखील नाही प्यायचा. आठच्या आधी त्याचा ट्रेनर त्याला जेवण तयार आहे याची बातमी द्यायचा. सकाळी, जेव्हा चार वाजायचे तेव्हा अक्षय कुमार दोन-तीन तास वर्कआऊट करायचा.
मनोज पाहवा यांनी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अनुष्का शर्मासोबत 'दिल धडकने दो' या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन जोया अख्तरनं केलं होतं. मनोजनं सांगितलं की शूटिंग सकाळी चार-पाच वाजेपर्यंत सुरु असायची. त्यानंतर सगळे झोपायला जायचे. तर अनुष्का आणि प्रियांका दोन तास वर्कआऊट करायचे आणि त्यानंतरच त्या झोपायला जायच्या.
दरम्यान, मनोज पाहवा यांनी या मुलाखतीत अने्क गोष्टींवर वक्तव्य केलं आहे. त्यापैकी एक म्हणजे आर्यन खानसोबत काम करण्यावर वक्तव्य केलं आहे. त्यांच्यात कोणत्या गोष्टी या अगदी हुबेहुब आहेत हे देखील सांगितलं.
हेही वाचा : 12 वर्षाच्या मुलीला शाळेत जाऊ देत नाही महेश बाबू! काय आहे नेमकं कारण?
मनोज पाहवानं त्याच्या करियरमध्ये अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांच्या काही चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर त्यांनी 'मुल्क', 'शादी में जरूर आना', 'वॉन्टेड', 'टोटल धमाल', 'अनेक', 'डरना जरूरी है', 'वन टू थ्री', 'डेढ इश्किया', 'धमाल' आणि 'जॉली एलएलबी' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.