Video .... म्हणून करीना कपूरला पुन्हा करायचंय लग्न

सैफ अली खानसोबत लग्न केल्यानंतर आणि दीड वर्षांपूर्वी आई झालेली बॉलिवूड सुपरस्टार करिना कपूरला पुन्हा लग्न करायचं आहे. करिनाने हा निर्णय विश्वसुंदरी मानुषी छिल्लरमुळे घेतला आहे. 

Updated: Apr 14, 2018, 10:48 AM IST
Video .... म्हणून करीना कपूरला पुन्हा करायचंय लग्न  title=

मुंबई : सैफ अली खानसोबत लग्न केल्यानंतर आणि दीड वर्षांपूर्वी आई झालेली बॉलिवूड सुपरस्टार करिना कपूरला पुन्हा लग्न करायचं आहे. करिनाने हा निर्णय विश्वसुंदरी मानुषी छिल्लरमुळे घेतला आहे. 

मानुषी आणि करिना कपूर  

मानुषी छिल्लर आणि करिना कपूर एका ज्वेलरी ब्रॅन्डच्या जाहिरातीसाठी एकत्र आल्या आहेत. मालाबार गोल्ड या ज्वेलरी ब्रॅन्डसोबत मानुषी छिल्लरची ही पहिलीच जाहिरात आहे.  

मालबार गोल्डसोबत करिना कपूर जाहिरात करत  होती. मात्र नव्या जाहिरातीमध्ये करिनासोबत आता मानुषीदेखील झळकणार आहे. 

खास जाहिरात  

जाहिरातीमध्ये मानुषी करिना कपूरला प्रश्न विचारते, ' तुला कशाप्रकारे लग्न करायचं आहे?' यानंतर तिला एक गिफ्ट देते. मानुषीचं बोलणं ऐकूण करिनाला पुन्हा लग्न करायचा मोह होतो. 
करिना आणि मानुषीची ही नवी जाहिरात सध्या सोशल मीडियावर चांगलीच ट्रेंड होत आहे. 

 

 

मानुषी विश्वसुंदरी 

17 वर्षांनंतर भारताकडे 'मिस वर्ल्ड' हा बहुमानाचा किताब मानुषी छिल्लरमुळे मिळाला. वैद्यकीय शास्त्राची विद्यार्थिनी असणारी मानुषी 'मिस वर्ल्ड' झाल्यानंतर काय करणार ? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. बॉलिवूडमध्ये मानुषी कधी दिसणार हा प्रश्नही अनेकांच्या मनात आहे. मात्र आता मानुषी मालाबार गोल्ड या ब्रॅन्डसोबत झळकली आहे. मालाबार गोल्डसोबत काम करण्याचा अनुभव खास होता. सोबतच हे क्षण माझ्या मनाच्या खूप जवळ राहतील असेही मानुषीने सांगितले आहे.