कोणासोबत एक रात्र घालवशील की...प्रश्न ऐकून Bhumi Pednekar चे वाजले बारा

तुला कोणासोबत एक रात्र वेळ घालवायला आवडेल...

Updated: Aug 31, 2022, 01:08 PM IST
कोणासोबत एक रात्र घालवशील की...प्रश्न ऐकून Bhumi Pednekar चे वाजले बारा title=
Shocking bollywood actress bhumi pednekar on one night stand

Bhumi Pednekar: सेक्स आणि बोल्ड सीन याशिवाय आता वेब सीरीज या पूर्णच होऊ शकत नाही, असं म्हणायला हवं. बॉलिवूड अभिनेत्री आता संस्कारी मुलगी आणि बहू याचा नजरेतून बाहेर आली आहे. आता अभिनेत्री बोल्ड आणि हॉट दिसली पाहिजे असा अंदाज या वेबसीरीज पाहू वाटायला लागलं आहे. बॉलिवूडमधील अभिनेत्रींनी आता जुनाट आणि रटाळ मर्यादा तोडल्या आहेत. बदलत्या काळानुरुप माणसांचे विचार आता बदलत आहेत.

लग्न, प्रेम, सेक्स आणि लैंगिक सुख याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला आहे. गेल्या काही वर्षात लिव्ह इन रिलेशनशीपचे वारे वाहत आहेत. अशात बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री हिने सेक्सबद्दल मोकळेपणे बोलून सगळ्यांना धक्का दिला आहे. तिच्या या विधानानंतर तिला टीकेलाही समोरे जावं लागलं आहे. (Shocking bollywood actress bhumi pednekar on one night stand)

वन नाईट स्टँड (one night stand)की, फ्रेंड्स विथ बेनिफिट्स? यापैकी आयुष्यात कुठली गोष्ट करायला आवडेल, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. तर या अभिनेत्रीने वन नाईट स्टँडऐवजी मला दीर्घ काळ टीकणारं नातं आणि फ्रेंड्स विथ बेनिफिट्स जगायला आवडेल, असं तिने सांगितलं. हे ठामपणे सांगणारी अभिनेत्री आहे, अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar). 

एका मुलाखतीत भूमीने आपल्या आयुष्याती सर्वात मोठं गुप्त उघड केलं. रिलेशनशिप, ब्रेकअप, प्रेम याबाबतच्या प्रश्नांची उत्तरं तिला विचारण्यात आल्यावर तिने स्पष्ट आणि ठामपणे उत्तरं दिली. तुला कोणासोबत एक रात्र वेळ घालवायला आवडेल की, दीर्घ काळासाठी नातं टीकवायला आवडेल? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. यातच वन नाईट स्टँड की, फ्रेंड्स विथ बेनिफिट्स? यापैकी एकाची निवड करण्यास सांगण्य़ात आलं. 

भूमीला प्रेमात झोकून देयला आवडतं, असं सांगत तिनं मनापासून प्रेम करण्यावर आपला विश्वास असल्याचं ती म्हणाली. कोणत्याही मुलीला आवडेल असंच उत्तर तिनं त्या मुलाखतीत दिलं होतं.