‘बाप’माणसाची गोष्ट सांगताना आपला सिद्ध्या रडला; पाहा Video

सर्वसामान्य मराठी कुटुंबात जन्मलेला सिद्धार्थ जाधव (Siddharth jadhav) आज प्रेक्षकांसाठी एक मोठा सेलिब्रिटी झाला आहे. मुख्य म्हणजे तो सेलिब्रिटी असला,  तरीही अनेकांसाठी तोच धमाल करणारा सिद्ध्या आहे

Updated: Oct 25, 2022, 10:55 AM IST
‘बाप’माणसाची गोष्ट सांगताना आपला सिद्ध्या रडला; पाहा Video  title=
Marathi Actor Siddharth Jadhav got emotional remember his parents

Siddharth Jadhav Cry : सर्वसामान्य मराठी कुटुंबात जन्मलेला सिद्धार्थ जाधव (Siddharth jadhav) आज प्रेक्षकांसाठी एक मोठा सेलिब्रिटी झाला आहे. मुख्य म्हणजे तो सेलिब्रिटी असला,  तरीही अनेकांसाठी तोच धमाल करणारा सिद्ध्या आहे. चाहत्यांची सुख-दु:खात साथ देणारा, समोरून मित्र दिसल्यावर त्याला घट्ट मिठी मारणारा.... आणि काय बोलतो....? असं म्हणत हक्कानं विचारपूस करणारा हाच तो सिद्धार्थ. कलाकार म्हणून मोठं होत असताना सिद्धार्थनं कधीच त्याच्यातला माणूस हरवून दिला नाही. त्यानं कायमच सर्वांना आनंद दिला. पण, त्याच्यावरच रडण्याची वेळ आली. तेही चारचौघांत.

स्टार प्रवाहवरील Show ‘होऊ दे धिंगाणा’च्या (hou de dhingana) एपिसोडदरम्यान सिद्धार्थ मोठ्या उत्साहात काहीतरी बोलायला जाणार तितक्यातच थांबला आणि पुढे जे घडलं ते पाहून त्यालाही धक्का बसला.

कारण, कार्यक्रम सुरु असतानाच तिथं सिद्धार्थचे आई-वडील आणि भाऊ (Siddharth Jadhav family) व्यासपीठावर पोहोचले होते. काही क्षणांसाठी सिद्धार्थ स्तब्धच झाला आणि लगेचच त्यानं भावाला घट्ट मिठी मारली.

अधिक वाचा : भगवद् गीतेवर हात ठेवून शपथ घेण्यापासून बरंच काही...; PM Rishi Sunak यांची बातच न्यारी

समोर वडिलांना पाहून त्यांचा संपूर्ण संघर्ष त्याच्या डोळ्यांसमोरून गेला आणि तो पटकन म्हणाला, ‘माझे वडील (dadar) दादरच्या प्लाझा थिएटरबाहेर पेपर टाकून झोपायचे. आज त्याच्या समोरच्या टॉवरमध्ये त्यांच्या मुलाने घर घेतलंय... अभिमान वाटतो त्यांना.’ हे म्हणत असताना सिद्धार्थला हुंदका दाटून आला.

संघर्षाचे दिवस आठवताना वडिलांनी दिलेलं योगदान आणि त्यांची मेहनतही तो विसरलेला नाही. या अवघ्या काही क्षणांमध्ये त्यानं आतापर्यंतचा प्रवासच जणू एका झटक्यात पाहिला आणि या अभिनेत्याच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. लेकाला रडताना पाहून लगेचच सिद्धार्तच्या आईनं त्याचे डोळे पुसले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

संघर्ष कोणालाही चुकलेला नाही. पण, जेव्हा त्या सर्व संघर्षाचं, प्रयत्नांचं फलित म्हणून काही सुखावह क्षण अनुभवायला मिळतात तेव्हा नकळतच डोळ्यांच्या कडा पाणावतात. बापमाणसाचा संघर्ष सांगताना आपण, त्यांना आता सुखी आयुष्य देऊ शकतोय या जाणिवेनं सिद्धार्थसोबतही असंच काहीसं घडलं.