Good News : मृण्मयी देशपांडे झाली आई? दत्तक घेतली मुलगी

नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी ही अभिनेत्री यावेळी तिने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. 

Updated: Jan 31, 2023, 05:52 PM IST
Good News : मृण्मयी देशपांडे झाली आई? दत्तक घेतली मुलगी

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील लाडकी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवला आहे. त्याचबरोबर तिचे गोड दिसणे आणि लाघवी हसणेही प्रेक्षकांना भूरळ पाडते. इतकंच नाही तर तिचे बहारदार नृत्य आपल्यालाही डोलायला लावते. एवढंच नव्हेतर मृण्मयी उत्तम गाते देखील. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी ही अभिनेत्री यावेळी तिने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. 

आजसुद्धा अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये मृण्मयीने आपण मुलगी दत्तक घेतल्याचं म्हटलं आहे. सांगायचं तर अभिनेत्रीची ही मजेशीर पोस्ट आहे. यामध्ये तिने आपल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिला आपली दत्तक घेतलेली मुलगी म्हटलं आहे.

मृण्मयीने पोस्ट करत लिहलंय, 'आमची दत्तक घेतलेली मुलगी गौतमी देशपांडे हीचा आज happy birthday आहे. आज ती वयाने खूप मोठी झाली आहे.. देव करो आणि वयाला लौकरात लौकर बुद्धी, शहाणपणा, समजूतदार पणा याची पण साथ मिळो.. बाकी प्रेम आहेच... I love you to the moon and back हे लिहावं लागतचं.. म्हणजे ते खरं पण आहेच... So I love you to the moon and back... You are my everything... My entire world... My happiness... ता.क - So I love you पासून वाचा pls आधीच मनातलं होतं... चुकून लिहिलं गेलं...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सोशल मीडिया प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. मृण्मयीने अभिनयाचा ठसा उमटवत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अभिनयाबरोबरच सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या मृण्मयीने तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे