रुमर्ड बॉयफ्रेंडसोबत कारमध्ये अशा अवस्थेत दिसली जान्हवी कपूर; Video व्हायरल

सध्या जान्हवी कपूर एका पार्टीत सहभागी झाली होती. यावेळी ती करण जोहरच्या घरातून निघताना दिसली. मात्र यावेळी ती एकटी नव्हती तर तिच्यासोबत एक व्यक्ती होती

Updated: Jan 31, 2023, 04:57 PM IST
रुमर्ड बॉयफ्रेंडसोबत कारमध्ये अशा अवस्थेत दिसली जान्हवी कपूर; Video व्हायरल

मुंबई : जान्हवी कपूर तिच्या रिलेशनशिपबद्दल खूप ओपन आहे. एक काळ असा होता की ती गुपचूप तिच्या बॉयफ्रेंडला भेटायची.  पण आता कोणत्याही कार्यक्रमात ती शिखर पहारियासोबत स्पॉट होते.  
 
कारमध्ये झाले स्पॉट
सध्या जान्हवी कपूर एका पार्टीत सहभागी झाली होती. यावेळी ती करण जोहरच्या घरातून निघताना दिसली. मात्र यावेळी ती एकटी नव्हती तर तिच्यासोबत शिखर पहाडियाही होता. ती त्याच्याशी बोलत होती आणि हसत होती. तेवढ्यात पपाराजींची नजर तिच्यावर पडली. जान्हवी कपूर जगापासून लपून-छपून प्रेम करत असेल, पण ती एक ना एक काहीतरी चूक करतेच जी लोकांना कळते.

जान्हवी कपूरने या पार्टीत तपकिरी रंगाचा ड्रेस परिधान केला होता, सोबतच बेज रंगाचा कोटही घातला होता. शिखर व्हिडिओमध्ये पापाराझींचा मार्ग रोखू नका असं सांगत आहे. अशा परिस्थितीत जान्हवी लाजते. तसं, जान्हवीची प्रतिक्रिया चाहत्यांना आवडली आहे. कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तर काही जण शिखर जान्हवीला टाईमपास बॉयफ्रेंड म्हणत होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जर आपण नुकतेच पार पडलेले इव्हेंट्सला कनेक्ट केलेतर, रुमर्डच्या जागी शिखर कंफर्ड बॉयफ्रेंड होईल. डिसेंबर 2022 मध्ये दोघेही एका कार्यक्रमात एकत्र दिसले होते. याशिवाय ते मुंबईत राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या एंगेजमेंटलाही पोहोचले होते.  शिखर पहारिया हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू आहेत. दोघंही एकमेकांना डेट करत होते पण आता ते वेगळे झाले आहेत, असे वक्तव्य शिखरने फार पूर्वीच केलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा त्यांना एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.