हातात चुडा, हिरवी साडी अन्...; प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात साखरपुडा

तिने 2016 मध्ये सोनाक्षी सिन्हासोबत 'अकिरा' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ती 'अट्टी' या तमिळ चित्रटात झळकली. 

Updated: Mar 14, 2024, 08:41 PM IST
हातात चुडा, हिरवी साडी अन्...; प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात साखरपुडा title=

Tejashree Jadhav-Rohan Singh Engagement : गेल्या काही महिन्यांपासून अनेक मराठी कलाकार हे लग्नबंधनात अडकताना दिसत आहे. शिवानी सुर्वे–अजिंक्य ननावरे, तितिक्षा तावडे-सिद्धार्थ बोडके, प्रथमेश परब-क्षितीजा घोसाळकर या कलाकारांनी लग्नगाठ बांधली. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा साखरपुडा पार पडला आहे. तिने स्वत: फोटो पोस्ट करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे. 

दाक्षिणात्य चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री तेजश्री जाधवचा साखरपुडा नुकताच पार पडला. तेजश्रीने तिचा प्रियकर रोहन सिंग याच्याबरोबर साखरपुडा केला आहे. तेजश्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याबद्दलची गुडन्यूज दिली आहे. तिने तिच्या साखरपुड्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 

साखरपुड्याचा मराठमोळा लूक चर्चेत

यावेळी तेजश्रीने छान मराठमोळा लूक केला होता. तेजश्रीने हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती. त्याबरोबरच तिने हातात हिरवा चुडा आणि छान हेअरस्टाईलही केली होती. तर रोहनने हिरव्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचे जॅकेट परिधान केले होते. "हे किती आश्चर्यकारक आहे की कोणीतरी एके दिवशी तुमच्या आयुष्यात येतं आणि त्यांच्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही", असे कॅप्शन तेजश्रीने या फोटोला दिले आहे. यासोबतच तिने 'आय लव्ह यू रोहन' असेही म्हटले आहे. तेजश्री आणि रोहनच्या साखरपुड्याचे अनेक फोटो सध्या व्हायरल होत आहेत. 

काही दिवसांपूर्वी तेजश्री आणि रोहनने गोव्याच्या समुद्रकिनारी बोल्ड फोटोशूट केले होते. या प्री-वेडिंग फोटोशूटची सर्वत्र चर्चा रंगली होती. यावेळी तेजश्रीने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. तर रोहनने पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि पँट परिधान केले होते. आता तेजश्रीने साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. 

दरम्यान तेजश्री जाधव ही मराठमोळी अभिनेत्री असली तरी तिने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अभिनयाची छाप उमटवली आहे. तिने 2016 मध्ये सोनाक्षी सिन्हासोबत 'अकिरा' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ती 'अट्टी' या तमिळ चित्रटात झळकली. यानंतर ‘माधुरी टॉकीज’ या हिंदी सीरीजमध्ये साकारलेल्या भूमिकांचं कौतुक झाले. ‘द जोकर : अ स्ट्रेंज किडनॅपर’ या हिंदी सीरीजमध्येही ती झळकली. ती कायमच ग्लॅमरस आणि बोल्ड लुकमध्ये पाहायला मिळाले.