तेजस्विनीचा डॉक्टरांना अनोखा सलाम

घटस्थापनेचा पहिला दिवस 

Updated: Oct 17, 2020, 01:52 PM IST
तेजस्विनीचा डॉक्टरांना अनोखा सलाम

मुंबई : घटस्थापना करून नवरात्रीच्या उत्सवाला सुरूवात झाली आहे. कोरोनाच्या या काळात बऱ्याच दिवसांनी मरगळ दूर होऊन उत्सवाचं वातावरण आहे. दरवर्षीप्रमाणे अभिनेत्री तेजस्विनी पंडितने अनोख्या पद्धतीने नवरात्रीत नवदुर्गांचा अवतार कलाकृतीतून मांडला आहे. यंदा तेजस्विनी शेअर केलेल्या पहिल्या देवीच्या रुपात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी महिलांना सलाम केलं आहे. 

देशभरात कोरोनाचं संकट आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून देशातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी रुग्णसेवेचं व्रत हाती घेतलं आहे. डॉक्टरांच्या रुपात देवंच आपल्या मदतीला धावून आले आहेत. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तेजस्विनीने देवीच्या रुपातील पहिला फोटो शेअर केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

प्रतिपदा : . . दैत्याने जिंकण्या मला देह तुझाच वेठीस धरला... अन मग मी सोडून त्रिशूळ भाला हाती stethoscope धरला... घुस्मटला जीव जरी हिम्मत तुझी सोडू नकोस आईच उभी आहे PPE किट मागे विसर त्याचा पाडू नकोस, विसर त्याचा पाडू नकोस. . . Design & Illustration : @indian_illustrator Photographer : @vivianpullan Writer : @rjadhishh_live Concept & Director : @dhairya_insta_ . . #navratri2020 #devi #devbarekaro #coronawarriors #thankyou #doctors #nurses #wardboys #healthcareworkers #tejaswwini #gratitude

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit) on

प्रतिपदा :

दैत्याने जिंकण्या मला देह तुझाच वेठीस धरला...
अन मग मी सोडून त्रिशूळ भाला
हाती stethoscope धरला...
घुस्मटला जीव जरी हिम्मत तुझी सोडू नकोस
आईच उभी आहे PPE किट मागे
विसर त्याचा पाडू नकोस,
विसर त्याचा पाडू नकोस.

या फोटोतून तेजस्विनीने डॉक्टरांची कृतज्ञता व्यक्त केली आहे. या फोटोत तेजस्विनीने पीपीई किट घातलं आहे. पीपीई किटमधील देवीचं साजरं रुप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोचं डिझाइन आणि इल्यूस्ट्रेशन उदय मोहितेने केलं आहे.