'आई आई संपतच नाही ग...', विशाखा सुभेदार यांच्या वाढदिवसानिमित्त लेकाची खास पोस्ट, फोटोही चर्चेत

विशाखा सुभेदार यांचा 22 मार्चला वाढदिवस असतो. त्यानिमित्ताने त्यांचा मुलगा अभिनयने एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

नम्रता पाटील | Updated: Mar 23, 2024, 06:43 PM IST
'आई आई संपतच नाही ग...', विशाखा सुभेदार यांच्या वाढदिवसानिमित्त लेकाची खास पोस्ट, फोटोही चर्चेत title=

Vishakha Subhedar Birthday Son Post : महाराष्ट्राला खळखळून हसवणारी आणि सध्या खलनायिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणून विशाखा सुभेदारला ओळखले जाते. विशाखा सुभेदार यांनी मालिकांसह चित्रपटातूनही प्रेक्षकांची मनं जिंकली. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे त्या खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाल्या. विशाखा सुभेदार यांचा 22 मार्चला वाढदिवस असतो. त्यानिमित्ताने त्यांचा मुलगा अभिनयने एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

अभिनय सुभेदार हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. तो नेहमी त्याच्या आईसाठी काही ना काही पोस्ट करत असतो. आता त्याने आईच्या वाढदिवसानिमित्त एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. त्यासोबत त्याने काही फोटोही पोस्ट केले आहे. विशेष म्हणजे हे सर्व फोटो कशाबद्दलचे आहेत, याचा उल्लेखही अभिनयने या पोस्टमध्ये केला आहे. 

अभिनय सुभेदारची पोस्ट

"दिवसभर काम करून घरी आलो आणि ही बाई घरी असली की बेड वरच बसून तुला जेवण गरम करून देऊ का माऊ? अशी एक गोड हाक मारते. त्या क्षणी वाटतं कीं घरी आलोय finally!!! तसाच आहे त्यां कपड्यात बेडरूम च्या दारापाशी उभं राहून 20 एक मिनिट तरी गप्पा होतात आणि मग मी माझ माझ जेवण गरम करून जेवायला बसतो. पहिला घास घेतल्याच क्षणी आई ग.. असा सुस्करा सुटतो. आणि इथेच 2 मिटर वर बसलेली आई आठवते. कधीच हट्ट नाही की तू इथेच बस बोलच आणि जेव.. तू तुला हव तसं खा.. तुझा वेळ आहे हा.. तुझी space आहे ती असं म्हणत स्वतः सुद्धा काहीतरी बघत झोपून जाते. पून्हा सकाळी उठलो की आई आई सुरु.. संपतच नाही ग तुझं नाव घेणं माझ्या आयुष्यात. अश्या माझ्या ह्या गोंडस, वेड्या, खुळ्या, entertainment ला Happy Birthday!! 

मी हे सगळे photo choose का केले ह्याच थोडं थोडं explanation देतो

1st and 2nd - 2)शूट वरून दमून भागून घरी आल्यावर माझी इच्छा आहे म्हणून कॅफे ला गेलेलो आम्ही. आणि 1) शूट वरून दमून घरी जाताना आम्ही!! नुसतं मित्रांना 10 min भेटायला नाटकं करतो काम करून आलो की, आणि फक्त मी म्हणतोय म्हणून 14 तासाची शिफ्ट तेही 2-2 सिरिअल्स at a time चालू असताना मला बाहेर घेऊन गेलेली आई, प्रेम फक्त... बस...

3rd - ofcourse मी एकटा थोडीय जो तिच्या कडे कामावरून आली की हट्ट करतो... ही आहे ना दुसरी.. आली कीं अंगावर उड्यामार, बाहेर चल अशी हट्ट करणारी आमचं बाळ stella. तिला भेटायच म्हणून शूट वरून अंबरनाथ ला येणारी आई.. ओढ फक्त... बस...

4th - मला खरंच ह्या गोडव्याबद्दल काय बोलावं सुचत नाहीं.. गोडवा फक्त... बस...

5th - खळी पासून केसांपर्यंत एकसारखे आम्ही... वेंधळे आम्ही... कॉपी फक्त... बस...

6th - सकाळ सकाळ washroom मध्ये डोळे सुद्धा उघडलेले नसताना असा चेहरा दिसला आणि मी थांबवूच शकलो नाहीं माझ हसू.. हसू नकोस रे आई वर.. असं म्हणत माझ्या जोकर ने मला तेव्हा जे हसवलं ते अजुनही मी ह्यावर रोज हसतो! वेडी फक्त.. बस...", असे अभिनय सुभेदारने या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

आणखी वाचा : 'केलेली मदत सांगायची नसते...', चाहत्याची 'ती' कमेंट पाहून विशाखा सुभेदारचे सडेतोड उत्तर, म्हणाली 'माझ्या...'

अभिनय सुभेदारने केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. सध्या विशाखा सुभेदार या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेत झळकत आहे. यात ती रागिनी महाजन हे नकारात्मक पात्र साकारत आहे. त्याबरोबरच ती ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकातही व्यस्त आहे. या नाटकाद्वारे तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले.