मराठी टीव्ही चॅनलचे जेष्ठ पत्रकार झाले रॅप सिंगर; म्हणतात, 'थक गया मै साला'

सध्या अनेक नवं-नवीन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अनेक अशी गाणी असतात जी रिलीज होतात आणि प्रेक्षकांच्या मनात घर करुन जातात. असंच एक नवं-कोर रॅप सॉन्ग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 

सायली कौलगेकर | Updated: Feb 11, 2024, 05:50 PM IST
मराठी टीव्ही चॅनलचे जेष्ठ पत्रकार झाले रॅप सिंगर; म्हणतात, 'थक गया मै साला' title=

मुंबई : सध्या एका रॅप सॉन्गने तरुणाईला वेड लावलं आहे. जेष्ठ पत्रकार उमेश कुमावत यांचे रॅप साँग 'थक गया मैं साला' हे प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.  25 वर्षापूर्वी पाहिलेलं एक स्वप्न पूर्ण झालंय, असं गाण्याचे गीतकार, गायक, अभिनेते उमेश कुमावत म्हणतात. हे गाणं केवळ युट्यूबवरच नाही तर इतरही प्लॅटफॉर्मवर हे गाणं उपलब्ध आहे. अवघ्या काही वेळातच हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. हे गाणं केवळ युट्यूबवरच नाही तर इतरही प्लॅटफॉर्मवर तुम्हाला पाहता येवू शकतं. सध्या गाण्याची तरुण वर्गात चांगलीच क्रेज पहायला मिळत आहे. उमेश कुमावत यांना लेखनाची फार आवड आहे. 25 वर्षापूर्वी पाहिलेलं एक स्वप्न त्यांचं या गाण्यानिमीत्त पूर्ण झालं आहे. या गाण्यासाठी त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

'थक गया मै साला' सध्या सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे. आत्तापर्यंत आपण संगीत क्षेत्रात फक्त गायिकी पार्श्वभूमी असणाऱ्या तरुणाईला पाहत आलो आहोत. मात्र आता या क्षेत्रात एका वृत्त वाहिनीच्या संपादकांनी पाऊल ठेवलं आहे, आणि ते नाव म्हणजे, उमेश कुमावत. उमेश कुमावत यांच्या गाण्याचा #TGMS हा हॅशटॅग म्हणजेच 'थक गया मैं साला.' गाण्याच्या प्रॉड्यूसर उमेश कुमावत यांच्या पत्नी हिना कुमावत या आहेत. 

''हे गाणं करण्यास उशीर झाला. आपलंही गाणं यावं हे माझं 25 वर्षांपूर्वीचं स्वप्न होतं. प्रत्येकाचा एक छंद असतो आणि तो छंद प्रत्येकाने जोपासायला हवा. हा माझा छंद होता. संगीत क्षेत्रात आपण काहीतरी करायला हवे, असं मनापासून वाटायचं. माझ्या काही जवळच्या मित्रांना ही इच्छा बोलूनही दाखवली होती. आज ती पूर्ण होत आहे. पत्रकारिता ही माझी पॅशन आहे आणि संगीत ही माझं आवड आहे. मी तरुण वर्गात येतो म्हणून मी रॅप सॉन्ग करण्याचं ठरवलं होतं'' असंही उमेश कुमावत म्हणाले.

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले उमेश कुमावत यांनी नव्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. 150 वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हे गाणं तुम्हाला पहायला मिळेल. या गाण्याचे गीतकार हे उमेश कुमावत आहेत. उमेश कुमावत यांनीच हे गाणं गायलं देखील आहे. गाणं रिलीज झाल्यानंतर पहिल्या तीन तासात या गाण्याने तीन हजार व्ह्यूजचा टप्पा ओलांडला आहे. उमेश कुमावत या यूट्यूब चॅनेलवर हे गाणं तुम्हाला ऐकयला मिळेल. सध्या सगळीकडेच या गाण्याची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x