प्राजक्ता माळीने चाहत्यांना दिली गुडन्यूज, मुहूर्ताचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली '2024 चे...'

प्राजक्ता माळीच्या आगामी चित्रपटात कोण कलाकार झळकणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

Updated: Feb 11, 2024, 05:48 PM IST
प्राजक्ता माळीने चाहत्यांना दिली गुडन्यूज, मुहूर्ताचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली '2024 चे...' title=

Prajakta Mali New Movie : 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीला ओळखले जाते. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत तिचा समावेश होतो. प्राजक्ता ही सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. त्यातच आता प्राजक्ता माळी ही लवकरच एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

प्राजक्ता माळीने नुकतंच तिच्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. तिने इन्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती पूजा करताना दिसत आहे. यावेळी ती चित्रपटाच्या शूटींगच्यावेळी वापरण्यात येणार क्लॅपचे अनावरण करताना दिसत आहेत. तसेच यावेळी त्यांची संपूर्ण टीमही तिथे दिसत आहे. 

प्राजक्ता माळीची चाहत्यांना गुडन्यूज

प्राजक्ताच्या आगामी चित्रपटाचा मुहुर्त नुकताच पार पडला. या इन्स्टाग्राम पोस्टला तिने हटके कॅप्शन दिले आहे. "ह्या वर्षातील पुढील चित्रपटास प्रारंभ. काल पुण्यात मुहूर्त पार पडला. मी  2024 या वर्षाचे खरंच आभारी आहे की त्याने मला सुरुवातीपासूनच कामात व्यस्त ठेवले आहे आणि मलाही हे आवडतंय", असे कॅप्शन प्राजक्ता माळीने दिले आहे. 

प्राजक्ता माळीच्या आगामी चित्रपटाचे नाव ठरलं

'भिशी मित्र मंडळ' असे प्राजक्ता माळीच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमित संघमित्र करत आहेत. तर याचे लेखन सागर पाठक याने केले आहे. या चित्रपटाची निर्मिती किरण कुमावत, लक्ष्मण कागने, विनया मोरे, अजिंक्य जाधव, अक्षय बोडके, गौरी पाठक हे करणार आहेत. प्राजक्ता माळीच्या आगामी चित्रपटात कोण कलाकार झळकणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

आणखी वाचा : 'डोक्यावर शिवरायांचा हात, रक्तात आंबडेकर आणि मनगटात...', क्रांती रेडकरची समीर वानखेडेंसाठी पोस्ट

दरम्यान प्राजक्ता माळीने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. चित्रपट, नाटक, वेबसिरीजच्या माध्यमातून प्राजक्ताने आपल्या अभिनयाची छाप सोडली. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ मालिकेतून प्राजक्ताला खरी ओळख मिळाली. प्राजक्ताने अभिनयाबरोबर सुत्रसंचालनही केलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मराठी विनोदी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राजक्ता करत आहे.