मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीला मिळाला पुष्कर सरद हा नवा उमदा चेहरा !!

झी युवा वाहिनीवरील नवीन मालिका 'कट्टी बट्टी' या अनोख्या प्रेमकथेत अभिनेत्री अश्विनी कासार सोबत पुष्कर शरद हा एक नवीन चेहरा पाहायला मिळत आहे .

Updated: Mar 8, 2018, 12:38 PM IST
मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीला मिळाला पुष्कर सरद हा नवा उमदा चेहरा  !! title=

मुंबई : झी युवा वाहिनीवरील नवीन मालिका 'कट्टी बट्टी' या अनोख्या प्रेमकथेत अभिनेत्री अश्विनी कासार सोबत पुष्कर शरद हा एक नवीन चेहरा पाहायला मिळत आहे .

पुष्कर हा मूळचा यवतमाळ मधील असून एका शेतकरी कुटुंबातील तरुण आहे. त्याने २०१० पासून यवतमाळ मधून राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घ्यायला सुरुवात केली . यवतमाळ  मध्ये पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर २०१२ ला मुंबई विद्यापीठात Academy of theatre arts मधून Master of theatre arts ही पदवीत्तर शिक्षण पूर्ण केले. छोट्या पडद्यावर पदार्पण करण्या आधी पुष्कर पृथ्वी थेटर मध्ये सलीम आरिफ सरांसोबत नाटकांना लागणाऱ्या प्रकाशयोजनेचे काम काम करत होता. त्याने अनेक प्रायोगिक नाटकांमध्ये सुद्धा काम केले आहे.

कट्टी बट्टी मालिका 

झी युवा वरील कट्टी बट्टी या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. कट्टी बट्टी मधून लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी कासार हिचेही पुनरागमन झाले आहे. पुष्कर मध्यमवर्गीय कुटुंबातील परागतिचे  निकमच्या भूमिकेत आहे जो पेश्याने प्राध्यापक आहे तर अश्विनी कासार सुद्धा मध्यम वर्गीय  कुटुंबातील पूर्वा बोराडेच्या भूमिकेत आहे, तिला शिक्षण सुरु ठेवत पीएचडी पूर्ण करायची आहे.

पुष्कर सरद मूळचा 

अहमदनगर शहरात राहत असलेल्या पूर्वा बोराडे आणि पराग निकम यांच्या मोडलेल्या लग्नाची पण त्याचबरोबर निरागस पणे एकमेकांवर जडलेल्या प्रेमाची ही गोष्ट आहे. मालिकेची नायिका पूर्वा, ही महाराष्ट्रातील असंख्य मुलींचं प्रतिनिधित्व करते. आपल्या माणसांची मन सांभाळत, उच्च शिक्षणाची इच्छा पूर्ण करत असलेली पूर्वा आणि प्राध्यापक असेलला पराग साधा जरी असला, तरीही विचार करण्याची त्याची पद्धत त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवते. एका शहरात राहणाऱ्या या दोन अपरिचित तरुणांचं एकमेकांसोबत ठरलेलं लग्न मोडतं.  त्यांनतर त्यांच्यात झालेली मैत्री आणि जडलेलं प्रेम हा प्रवास यात आहे. हलक्या फुलक्या विनोदी अंगाने जाणारी ही प्रेम कथा आहे.

छोट्या पडद्यावरील त्याच्या प्रथम पदार्पणाच्या उत्सुकते विषयी बोलताना, पुष्कर सरद म्हणाला, ' छोट्या पडद्यावर काम करण्याची माझी ही पहिली वेळ आहे कट्टी बट्टी ही मालिका अहमदनगर ची असल्या कारणामुळे भाषा शिकण्यासाठी मी खूप मेहनत घेतली. संदेश कुलकर्णी यांनी आमचे 'नगर' भाषेवर कार्यशाळा घेतल्या त्यामुळे आता जी माझी भाषा तुम्ही बघत आहात ती आहे. भाषेवर प्रभुत्व मिळाल्यामुळे पराग निकम हे पात्र समजून घ्यायला आणि करायला सोपे गेले. बहुतेक कलाकार हे नगर आणि औरंगाबाद मधील असल्याकारणाने आणि शूटिंग सुद्धा अहमदनगर मध्ये असल्यामुळे नगरचे अनेक मित्र झाले आहेत आणि त्यांची इथे काम करताना खूप मदत सुद्धा होते.

मी मालिकेच्या संपूर्ण टीमचा अत्यंत आभारी आहे कारण प्रत्येकाच्या पाठिंब्यामुळे मी माझे १०० टक्के देऊ शकतोय. तसेच अश्विनी कासार सोबत माझं पदार्पण झालंय या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. आमचं ट्युनिंग खूप चांगलं जमतं त्यामुळे तिच्यासोबत काम करताना खूप छान वाटतं. झी युवा आणि पोतडी एंटरटेनमेंट चे विनोद लव्हेकर आणि निखिल सेठ यांनी माझ्यावर दाखवलेलया विश्वासामुळे तुम्ही मला या भूमिकेत पाहत आहेत. पडद्यावर काम करण्याचा एकूणच अनुभव अतिशय चांगला आहे आणि मालिकेमधील माझ्या भूमिकेविषयी प्रेक्षकांचा प्रतिसाद काय आहे याची मी वाट पहात आहे.” तरमग पहायला विसरु नका, कट्टी बट्टी सोमवारी ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त झी युवा वर !