मुंबई : 'जगात भारी कोल्हापुरी' असं म्हणत कोल्हापुरकर कायमच हटके गोष्टी करत असतात. असाच एक कोल्हापुरकरांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संकल्पना आमदार ऋतुराज पाटील आणि हर्षल सुर्वे यांची आहे. हा व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडणाऱ्या गडकिल्ल्यांवर चालणाऱ्या आक्षेपार्ह घटनांवर भाष्य करणारा हा व्हिडिओ आहे. तसेच गडकिल्ल्यांची नावं बारला दिले जातात. याला देखील या व्हिडिओतून विरोध करण्यात आला आहे. आणि हाच मुद्दा घेऊन विधानसभेत आवाज उठवणार असल्याचं आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं आहे.
गड, किल्ले हा महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपत आहेत. पण आजची तरूणाई या गोष्टी जतन न करता त्याच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरत आहेत. तसेच आज त्यांच्या कृतीमुळे या किल्ल्यांचा अपमान होत आहेत. या सगळ्यावर भाष्य करणारा हा व्हिडिओ आहे.
या गाण्याचे गीतकार युवराज पाटील असून संगीतकार ऐश्वर्य मालगावे आहे. 'मर्दा सारखं वाग जरा' या गाण्याचे दिग्दर्श नितीन जाधव यांनी केलं असून छायांकन चेतन कुंभार आणि संकलन चंद्रशेखर गुरव यांनी केलं आहे. हर्षल सुर्वेंच्या संकल्पनेतून तयार झालेले हे गाणे त्यांनीच गायले आहे.