लोकप्रिय अभिनेत्रीच्या ड्रेसला अशा ठिकाणी कट, ज्यामुळे....

कपड्यापेक्षा सगळीकडे मार्क्सचीच चर्चा 

Updated: Dec 6, 2021, 08:59 AM IST
लोकप्रिय अभिनेत्रीच्या ड्रेसला अशा ठिकाणी कट, ज्यामुळे....

मुंबई : सेलिब्रिटी त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रेसमुळे नेहमीच चर्चेत असतात. या ड्रेसमध्ये अनेक कट असल्यामुळे ते खूप चर्चेत असतात.  अनेकदा अभिनेत्री त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनकरता वेगवेगळ्या रिऍलिटी शोमध्ये येतात. पण त्यावेळी त्यांच्या सिनेमापेक्षा ड्रेसचीच चर्चा अधिक असते.  ड्रेसमधील कट आणि त्यातून दिसणार्‍या मार्क्समुळेच हे कलाकार लोकांच्या नजरेत जास्त येतात. असाच काहीसा प्रकार 'बिग बॉस ओटीटी'मध्ये दिसलेली अभिनेत्री दिव्या अग्रवालसोबत घडला.

डान्स दरम्यान घडला हा प्रकार 

दिव्या अग्रवाल डान्स करते तसंच ती रिऍलिटी शोमध्ये परफॉर्म करते. दिव्याने नुकताच सोशल मीडियावर डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये लोकांची नजर तिच्या पाठीवर पडलेल्या खूणावर गेली.

ड्रेसच्या कटमुळे सगळा गोंधळ 

या व्हिडिओमध्ये दिव्या अग्रवाल तिच्या डान्स पार्टनरसोबत निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये डान्स करताना दिसत आहे. दिव्याचा ड्रेस समोरून पूर्णपणे झाकलेला आहे पण मागच्या बाजूला उघडा आहे. या मोकळ्या जागेत दिव्याने तिच्या पाठीकडे पाहिलं तेव्हा तिच्या पाठीवरची खूण स्पष्ट दिसत होती.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल 

हा व्हिडिओ स्वतः दिव्या अग्रवालने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले - 'शेवटी माझ्या आवडत्या जोडीदारासोबत.' यासोबतच दिव्याने सुरेशला टॅग केले.