मुंबई : चित्रपटाची कथा रुपेरी पडद्यावर जशीच्या तशी उतरवण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्माते सर्व प्रयत्न करतात. अभिनेते देखील सीन खरा वाटावा आणि प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाने घरा करावे यासाठी स्वतःच्या जीवावर खेळण्यासाठी तयार होतात. दरम्यान त्यांना अनेक इजा देखील होतात. एवढंच नाही तर अभिनय करत असताना अनेकांना प्राण देखील गमवावे लागले आहे. असचं काही झालं आहे अभिनेत्री मार्था मॅन्सफील्ड (Martha Mansfield) सोबत. आजही तो क्षण आठवला तर थरकाप उडतो.
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मार्था मॅन्सफिल्डचा एक भयानक अपघात झाला, ज्यानंतर अनेक प्रयत्न करूनही तिचा जीव वाचू शकला नाही. मार्था मॅन्सफिल्ड ही त्या काळातील सुपरस्टार होती जेव्हा चित्रपटांना आवाज नव्हता. 'द वॉरन्स ऑफ व्हर्जिनिया' साठी शूटिंग करत असताना, मार्था मॅन्सफिल्डने तिचा सिव्हिल वार कॉस्ट्यूम घातला होता. या कपड्यांना लवकर आग पकडते.
सीन संपवून ती गाडीत बसली आणि आराम करायला लागली. त्याचवेळी जवळून जाणाऱ्या एका व्यक्तीने तिच्या दिशेने माचिसची काडी फेकली. त्या आगीच्या ठिणगीमुळे मार्थाच्या ड्रेसला आग लागली आणि ती जळून खाक झाली. अपघातानंतर मार्था मॅन्सफिल्डला रुग्णालयात नेण्यात आले आणि तिच्यावर दोन दिवस उपचार सुरू राहिले. पण मार्था मॅन्सफिल्ड इतकी भाजली की तिला वाचवता आले नाही. दोन दिवसांनी मार्थाने आपला जीव गमावला.