टू पीस बिकिनीमध्ये पुस्तक वाचत दिसली मौनी रॉय, फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

टीव्ही अभिनेत्री मौनी रॉयच्या चाहत्यांची संख्या मीलियनमध्ये आहे. 

Updated: Feb 10, 2022, 08:19 PM IST
टू पीस बिकिनीमध्ये पुस्तक वाचत दिसली मौनी रॉय, फोटोंची सोशल मीडियावर चर्चा  title=

मुंबई : टीव्ही अभिनेत्री मौनी रॉयच्या चाहत्यांची संख्या मीलियनमध्ये आहे. अभिनेत्री तिच्या सौंदर्यापासून तिच्या फिगरपर्यंत सगळ्याच गोष्टींमुळे चर्चेत असते. मौनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या चाहत्यांच्या यादीत पुरुष आणि महिला दोघांचा समावेश आहे. नागिन या मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेली मौनी दररोज सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो शेअर करत असते. आता अभिनेत्रीने काही बोल्ड आणि सुंदर फोटो शेअर केले आहेत जे कोणाच्याही हृदयाचा ठोका चुकवतील.

मौनीने आता तिचे काही बोल्ड आणि सुंदर फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती ग्रे कलरची टू पीस बिकिनी परिधान केल्याचं दिसत आहे. या फोटोंमधील अभिनेत्रीची प्रत्येक पोझ अतिशय मनमोहक आहेत.
 
सध्या मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असल्याचं पहायला मिळत आहे. या ताज्या फोटोंमध्ये, मौनी राखाडी रंगाची बिकिनी घालून वाळूत पडून पुस्तक वाचताना दिसत आहे. यासोबतच ती कॅमेऱ्यात पाहून मनमोहक स्टाईलने पोजही देत ​​आहे.

याशिवाय अभिनेत्रीने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीच्या सगळ्या पोस्टवर चाहते त्यांचं प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. मौनीच्या प्रत्येक पोस्टला लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्स असतात. तिने यावेळी देखील चाहत्यांना एक सुंदर व्हिज्युअल ट्रीट दिली आहे.

अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतंच तिचं एक नवीन अल्बम गाणं 'बैत-बिठे' रिलीज झालं आहे. या गाण्यात तिच्यासोबत अंगद बेदीही आहे. चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर ती रणबीर कपूर आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन स्टारर 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातही दिसणार आहे. याशिवाय मौनीने तिचं अभिनय कौशल्य ओटीटी प्लॅटफॉर्मवर पसरवलं आहे. ती लंडन कॉन्फिडेन्शियल या वेब सीरिजमध्ये दिसली आहे.