Viral Video : Salman Khan च्या 'त्या' एका गोष्टीसाठी Katrina Kaif पासून बॉलिवूड अभिनेत्री आल्या एकत्र

Viral Video :  सलमान खान (Salman Khan) कायम कुठल्या ना कुठल्या कारणावरुन सतत चर्चेत असतो. चाहते अनेक वर्षांपासून त्याचा लग्नाची वाट पाहत आहेत. असं नाही की त्याची कोणी गर्लफ्रेंड (Salman Girlfriend) नव्हती. सल्लूमियाच्या अशा एका गोष्टीसाठी त्याची एक्स गर्लफ्रेंडपासून बॉलिवूडमधील अभिनेत्री धावून आल्या होत्या. 

Updated: Feb 20, 2023, 11:44 AM IST
Viral Video :  Salman Khan च्या 'त्या' एका गोष्टीसाठी Katrina Kaif पासून बॉलिवूड अभिनेत्री आल्या एकत्र title=
Salman Khan Aishwarya Rai Katrina Kaif Preity Zinta Sushmita Sen Priyanka Chopra Kareena Kapoor Bipasha Basu Rani Mukherjee Throwback Video Trending Viral

Trending Viral Video : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे (Salman Khan) अनेक प्रेमप्रकरण आजही चर्चेत आहेत. ऐश्वर्या राय आणि सलमान खानचे लव्ह अफेयर (Aishwarya Rai and Salman Khan's love affair) त्या काळात गाजलं होतं. त्यानंतर कॅटरीना कैफ आणि त्याचा प्रेमाचे अनेक किस्से आहेत. आज ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हिचं अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा मुलगा आणि अभिनेत्या अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याच्यासोबत लग्न झालं. तर कॅटरीनाने विकी कौशलसोबत लग्न (Salman Khan love life) केलं आहे. पण आजही सलमान खान एकटाच आहे. 50 उलटून गेली तरी सल्लूने अजून लग्न केलं नाही. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रीसोबत त्याचं नाव जोडलं गेलं. पण तरीही तो वयाच्या या टप्प्यात सिंगल (Salman Khan marriage) आहे. सलमान खानच्या एका गोष्टीसाठी एकदा बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्री अगदी कॅटरीना कैफदेखील धावून आली होती. या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होतो आहे. (Social media Trending video)

जेव्हा सलमान खानसाठी त्या एकत्र आल्या...

हा व्हिडीओ पाहून तुमचे डोळे नक्कीच चक्रावून जाईल. या व्हिडीओमध्ये तुम्हाला सलमानची एक्स गर्लफ्रेंड कॅटरीना कैफ (Katrina Kaif), प्रीती झिंटा (Preity Zinta), सुष्मिता सेन (Sushmita Sen), प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) , करीना कपूर (Kareena Kapoor), बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि राणी मुखर्जी (Rani Mukherjee) रॅम्पवर त्यांचा जलवा दिसून येईल. हो या सगळ्या अभिनेत्री एकत्र आल्या होत्या सलमान खानच्या बीइंग ह्यूमन (Being Human) या ब्रँडच्या कपड्याच्या फॅशन शोसाठी...

जुना व्हिडीओ (Throwback Video)

हा खूप वर्षांपूर्वीचा आहे, पण तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ साधारण 12 वर्षांपूर्वीचा आहे.

त्यावेळी या अभिनेत्री कशा दिसायला ते पाहून अनेक नेटकरी अवाक् झाले आहेत. सलमान खानने बीइंग ह्युमन हे फाउंडेशन 2007 मध्ये सुरु केलं आहे. त्यातून मिळाली पैसा तो लहान मुलांच्या आरोग्य, हृदय शस्त्रक्रिया आणि त्यांचा शिक्षणावर खर्च करतो. (Salman Khan Aishwarya Rai Katrina Kaif Preity Zinta Sushmita Sen Priyanka Chopra Kareena Kapoor Bipasha Basu Rani Mukherjee Throwback Video Trending Viral)

असो पण या व्हिडीओमध्ये यंग अभिनेत्रींना पाहून नेटकरी पुन्हा त्यांचा प्रेमात पडले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Instagram video) इन्स्टाग्रामवर pinkvillausa या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.