'पतीच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झालं नाही अन् तू...', म्हणणाऱ्या नेटकऱ्याला अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर म्हणाली...

अभिनेत्रीनं शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे. 

Updated: Nov 3, 2022, 03:09 PM IST
'पतीच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झालं नाही अन् तू...', म्हणणाऱ्या नेटकऱ्याला अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर म्हणाली... title=

मुंबई : अभिनेत्री मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मयुरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून मयुरीला लोकप्रियता मिळाली होती. गेल्यावर्षी मयुरीच्या पती आशुतोषनं आत्महत्या केली. आशुतोषच्या निधनानंतर मयुरी पुन्हा एकदा स्वत: ला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, मयुरी या सगळ्यात संपूर्ण कुटुंबासोबत एका ट्रीपवर गेली. त्याचे काही फोटो मयुरीनं सोशल मीडियावर शेअर केले आणि हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

मयुरीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. व्हिएतनामच्या या ट्रीपचे मयुरीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. यावेळी मयुरीच्या फोटोंवर कमेंट करत नेटकऱ्यांनी पतीच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झालं नाही तरी तू ट्रीपला जातेस एन्जॉय करायला लागलीस असं म्हणतं ट्रोल करायला सुरुवात केली. नेटकऱ्यांनी केलेली ही कमेंट पाहता मयुरीनं एका नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कमेंट करणाऱ्या नेटकऱ्यांपैकी एका नेटकऱ्याची कमेंट मयुरीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. या वेळी मयुरी म्हणाली, 'जर आपण लोकांबद्दल विशिष्ट मत तयार न करता किंवा त्यांना Judge न करता जगू दिलं तर हे जग खूप हेल्दी राहील. स्वतःचा आनंद शोधणं सामान्य असायला हवं.' (mayuri deshmukh got trolled because she gone on trip after one year of husband s death) 

mayuri deshmukh got trolled because she gone on trip after one year of husband s death

दरम्यान, मयुरीनं 20 जानेवारी 2016 रोजी आशुतोष भाकरेसोबत सप्तपदी घेतल्या होत्या. आशुतोषनं ‘इच्यार ठरला पक्का’ आणि ‘भाकर’ या दोन चित्रपटांमध्ये काम केलं होतं. तर लॉकडाउनपूर्वी मयुरीचं ‘तिसरे बादशाह हम’ हे नाटक सुरु होतं. मयुरीच्या कामाबद्दल बोलायचं तर तिनं ‘इमली’ या मालिकेत साकारलेली मालिनी ही भूमिका प्रसिद्धीस उतरली होती.