मुंबई : दोन वर्षांनंतर प्रत्येक जण गणेशोत्सव (Ganeshotsav) मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे. फक्त सर्वसामान्यच नाही तर, सेलिब्रिटींनी देखील गणरायाचं दिमाखात स्वागत केलं. 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgath) मालिकेतल्या परीच्या घरी बाप्पांचं आगमन झालं आणि दीड दिवसांनी विसर्जनही झालं. बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना रडायला येतं, असच काही परी म्हणजेच मयारासोबत (Myra Vaikul) देखील झालं. दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देताना परी ढसाढसा रडू लागली. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मयरा व्हिडीओमध्ये म्हणत आहे, 'देव बाप्पा का रे मला सोडून गेलास? खरं सांगू आता मला तुझी खूप आठवण येईल. मी तुला खूप सारे मोदक लाडू देईन. तू लवकर ये हं. मी तुझी वाट बघते. ' मायराच्या या व्हिडीओला अनेकांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (ganapati visarjan)
'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील परीने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सर्वांना आपल्या अभिनयाने आश्चर्यचकित करणारी परी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. (Mazhi Tuzhi Reshimgath fame pari cried on ganapati visarjan)
इन्स्टाग्राम परीचं (Myra Vaikul social media) स्वतःचं अकाउंट आहे. इन्स्टाग्रामवर परीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आहे. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.