Raju Srivastava यांच्या प्रकृतीत सुधारणा, पण कधी काढणार व्हेंटिलेटर...

Raju Srivastava अद्यापही व्हेंटिलेटरवर, प्रकृती पूर्ण सुधारण्यासाठी लागणार एवढा वेळ...  

Updated: Sep 4, 2022, 09:27 AM IST
Raju Srivastava यांच्या प्रकृतीत सुधारणा, पण कधी काढणार व्हेंटिलेटर... title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कॅमेडियम राजू श्रीवास्तव (standup comedian raju shrivastav) दिल्लीच्या एम्समध्ये उपचार घेत आहेत. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टर आणि कुटुंबियांकडून सतत मिळत आहे. आता देखील त्यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत थोडी सुधारणा झाली आहे. डॉक्टरांच्या उपचारांनाही तो पूर्वीपेक्षा प्रतिसाद देऊ लागले आहेत. मात्र, ते अजूनही दिल्लीच्या एम्समध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. 

राजू श्रीवास्तव  ( Raju Srivastava Health update) यांची प्रकृती पूर्ववत होण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात, असंही डॉक्टरांनी सांगितलं.  राजू यांना बरं होण्यासाठी आणखी 10 ते 12 दिवसांचा कालावधी लागू शकतो. अशी माहिती देखील डॉक्टरांनी दिली आहे.

 सध्या राजू हे तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमच्या सतत देखरेखीखाली आहेत. राजू यांना एम्समध्ये दाखल करून 25 दिवस झाले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावरही त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवांना उधाण आलं आहे. त्‍याच्‍यावर त्‍याच्‍या कुटुंबियांना त्‍याच्‍या कॉमेडियनबद्दल चुकीच्‍या बातम्या पसरवू नका अशी विनंतीही केली होती.

राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका (Raju Srivastava suffered a heart attack) आल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तर गेल्या 10 ऑगस्टपासून राजू श्रीवास्तव हे व्हेंटिलेटर आहेत. राजू यांचे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करतायेत.