गुरूला बॉस राधिका आपली पत्नी आहे हे सांगायला लाज वाटते का?

राधिका गुरूला कसा धडा शिकवणार?

मुंबई : माझ्या नवऱ्याची बायको या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेच्या कालच्या एपिसोडची सुरुवात राधिकाच्या ऑफिस पासून झाली. राधिका आपल्या कामगारांचे आनंदपुढे कौतुक करीत आनंदला सांगते की आपल्याला खूप काम करू टार्गेट पुरे करायला हवे. तेव्हा अथर्वला घेण्यासाठी राधिका निघून जाते. राधिका बाहेर जात असताना गुरूला बक्षींचा फोन येतो आणि गुरु त्यांना म्हणतो मी आता दुसऱ्या बॉसच्या हाताखाली काम करतो, जिचे नाव राधिका असे काहीतरी आहे, ते ऐकून पुन्हा राधिका गुरूचा अपमान करीत म्हणते आता का लाज वाटते? बॉस बायकोच आहे असे सांगा की त्यांना. तेव्हा काहीच न बोलता गुरु फोन कट करतो.

दुसरीकडे सरीता नानींकडे जाऊन काल घडलेल्या प्रसंगावरून माफी मागतात, तेव्हा नानी सरीताला म्हणतात की, एवढ्या कशा बदलला तुम्ही ? जसे पूर्वी तुम्ही राधिकाशी वागत होतात तसे आता तुम्ही नाही वागत तिच्याशी. तेव्हा सरीता राधिका घटस्फोट घेण्याच्या निर्णयावरून चुकीचे वागत आहे असे सांगते. तेव्हा राधिकाच्या बाजू मांडत नानी सरीताला समजावून सांगतात. तरीही सरीता नानींचे काही एक ऐकून घेत नाही व तिथून निघून जाते. दुसरीकडे नाना आणि श्री सुभेदार सुद्दा सरीताच्या वागणुकीवरून चर्चा करतात व ती गुरूच्या प्रेमात फार आंधळी झाली आहे असे श्री सुभेदार नानांना सांगतात. दरम्यान नानाही आपल्या सोडून गेलेल्या मुलाचा दाखल देऊन म्हणतात आपण दोघेही समदुःखी आहोत. तिकडे शनाया केड्या आणि मावशीला भेटायला जाते. पण मावशी काही तिला भेटायला येत नाही. तेव्हा केड्या शनायाला तिच्या प्रॉब्लेम्सचे कारण विचारते. तेव्हा शनाया रडत रडत सांगते की, मी तिथे आता टेबल पुसते. तेव्हा केड्या म्हणतो दुःखात आपण आपले सुख मानायचे आणि काम करायचे. शेवटी केड्यावर रागावून शनाया तिथून निघून जाते.

दरम्यान गुरु खूप वेळ कामात बसलेला पाहून रघु गुरुला घरी जायची आठवण करून देतो. तेव्हा ऑफिसमध्ये कुणीच नसताना गुरु राधिकाच्या कॅबिनमध्ये जाऊन पूर्वी आपल्या असलेल्या खुर्चीकडे पाहून रागाने म्हणतो, मी मेहनतीने कमावलेले यश, प्रतिष्ठा आणि नाव जे राधिकामुळे गमावले ते पुन्हा मिळवीन अशी प्रतिज्ञा घेतो. गुरूने केलेली प्रतिज्ञा तो पूर्ण करण्यात यशस्वी होईल का हे बघण्यासाठी माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचा पुढील एपिसोड बघायला विसरू नका.