20 वर्ष मोठ्या असलेल्या दिलीप कुमार यांच्याशी लग्न करून सायराला मिळाला धोका...

दुप्पट वयाच्या दिलीप कुमार यांच्याशी का केलं लग्न 

20 वर्ष मोठ्या असलेल्या दिलीप कुमार यांच्याशी लग्न करून सायराला मिळाला धोका...

मुंबई : सुंदर दिसण्यामुळे आणि अभिनयामुळे लोकांवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री सायरा बानो यांचा जन्म 23 ऑगस्ट 1944 रोजी मसुरीमध्ये झाला. सायरा बानो यांची चर्चा केली तर आपोआप दिलीप कुमार यांच नाव आणि त्यांच्या प्रेमकहाणीची चर्चा ही होतेच. सायरा बानो यांच्या वाढदिवसादिवशी जाणून घेऊया त्यांच्याबद्दल 

सायरा बानो यांच प्रोफेशनल जीवन जितकं सुंदर आहे तितकंच त्यांच खरं आयुष्य रंजक आहे. सायरा बानो यांनी देखील कधी विचार केला नसेल की त्या 22 व्या वर्षी आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडेल. प्रेम आंधळ असतं असं म्हणतात आणि हे दिलीप कुमार यांच्याबाबतीत ही खरं ठरलं. सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांना पाहताच लग्न करेन तर दिलीप कुमार यांच्याशी असं ठरवलं होतं. दिलीप कुमार - सायरा बानो यांची सर्वात जुनी लोकप्रिय जोडी आहे. सायरा बानो यांनी 1966 मध्ये 22 व्या वर्षी दिलीप कुमार यांच्याशी लग्न केलं. तेव्हा दिलीप कुमार 44 वर्षांचे होते. दिलीप कुमार यांना आपल्या आणि सायरातील वयाच्या अंतराची जाणीव होती. त्यांनी तिला लग्न करण्यापूर्वी एकदा आपल्या सफेद केसांकडे बघायला सांगितलं. पण तेव्हा सायरा बानो यांनी दिलेल्या उत्तरामुळे दिलीप कुमार शांत झाले आणि त्यांनी लग्न केलं. 

या लग्नानंतर एक कटू सत्य समोर आलं ते म्हणजे दिलीप कुमार यांनी 1980 मध्ये दुसरं लग्न केलं. तेव्हा अशी चर्चा होती की, सायरा बानो कधीच आई होऊ शकत नाही. बाळासाठी दिलीप कुमार यांनी अस्मासोबत लग्न केलं. या लग्नामुळे सायरा बानो खूप खचल्या पण हे लग्न जास्त काळ टिकलं नाही. 1983 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 

सायरा बानो होत्या गरोदर 

सायरा बानो - दिलीप कुमार यांना संतान नाही. पण त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये त्यांनी याचा खुलासा केला आहे की, 1972 मध्ये सायरा बानो या गरोदर होत्या. 8 महिन्याच्या गरोदर असतान सायरा बानो यांना ब्लड प्रेशरचा त्रास होता. त्यावेळी सर्जरी करून बाळाला वाचवणं शक्य नव्हतं. अशावेळी त्या बाळाचा मृत्यू झाला. नंतर कळलं की तो मुलगा होता. यानंतर सायरा बानो कधीच गरोदर राहिल्या नाहीत.