'माझ्या नवऱ्याची बायको' टीआरपीमध्ये एक नंबर

झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत दिवसेंदिवस वेगवेगळी वळणे येतायत. 

Updated: Apr 24, 2018, 03:26 PM IST
'माझ्या नवऱ्याची बायको' टीआरपीमध्ये एक नंबर title=

मुंबई : झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत दिवसेंदिवस वेगवेगळी वळणे येतायत. राधिका सुभेदारचा बदललेला लूक तिचा बदललेला अॅटिट्यूड मुळे मालिकेने वेगळेच वळण घेतलेय. राधिकाच्या बदललेल्या स्वभावामुळे ती गुरुला कशी टक्कर देणार. शनायाला कशी पळता भुई थोडी करणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. त्यामुळेच की काय ही मालिका टीआरपीमध्ये अव्वल स्थानावर आहे. 

वर्षभर मालिका अव्वल स्थानावर

मराठी मालिकेत पहिल्यांदाच 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेने असे काही तरी केलेय जे कोणालाच जमले नाही. जवळपास वर्षभर ही मालिका टीआरपीमध्ये अव्वल स्थानावर आहे. या मालिकेने टीआरपीमध्ये आपला पहिला नंबर कायम ठेवलाय. मराठी मालिकेच्या इतिहासातील हा एक विक्रमच आहे.

मालिका ऑगस्टमध्ये सुरु झाली होती. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेचे टायटल वाचूनच याची उत्सुकता वाढली. हळूहळू मालिकेतील पात्रे उलगडत गेली. मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न आले यामुळे हे पाहण्याची उत्सुकता अधिकच वाढू लागली आणि ती अद्यापही कायम आहे. 

टीआरपीमध्ये 'माझ्या नवऱ्याची बायको' अव्वल स्थानावर तर 'तुझ्यात जीव रंगला' दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर 'तुझं माझं ब्रेकअप', चौथ्या स्थानावर 'लागिरं झालं जी' आणि पाचव्या स्थानावर 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम आहे.